Gold- Silver Price Today: महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील सोने चांदी दर घ्या जाणून

आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातू या वर्गात मोडणाऱ्या सोने या धातूच्या दरात (Gold- Silver Price Today) काहीशी वाढ होत आहे. आज सोने बाजारात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,860 रुपये आहे. जी पाठीमागील ट्रेडमध्ये मौल्यवान धातूची किंमत 47, 740 रुपये प्रति ग्रॅम इतक्या किंतमीवर बंद झाली होती.

Gold Rate | Photo Credits: Pixabay.com)

आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातू या वर्गात मोडणाऱ्या सोने या धातूच्या दरात (Gold- Silver Price Today) काहीशी वाढ होत आहे. आज सोने बाजारात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,860 रुपये आहे. जी पाठीमागील ट्रेडमध्ये मौल्यवान धातूची किंमत 47, 740 रुपये प्रति ग्रॅम इतक्या किंतमीवर बंद झाली होती. गुडरिटर्न्स ही वेबसाईट सोने, चांदी दराबाबत नेहमी माहिती देत असते. या माहितीनुसार चांदी दराबाबत सांगायचे तर बाजारात चांदी 62, 400 रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. इथे दिलेले दर हे मूळ रुपात असतात. त्यात जीएसटी विविध राज्यांचे आणि स्थानिक कर यांचा अंतर्भाव झाल्यास हे दर बदलू शकतात. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोने चांदी दर (Gold- Silver Price Today) घ्या जाणून.

खाली दिलेले सर्व दर गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार आहेत. वर देण्यात आलेले सोने, चांदी दर हे केवळ सूचक आहेत. त्यात GST, TST यांसारख्या दरांचा समावेश नाही. सोने, चांदी यांचे मूळ दर वेगळे असतात. त्यात उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्क लागल्याने राज्य आणि प्रांतवार या दरांमध्ये तफावत आढळते. विविध राज्यांमध्ये उत्पादन शुल्क वेगवेगळे असल्याने राज्यनिहाय सोने, चांदी दरात फरक असू शकतो. कधी हा फरक अधिक असतो कधी कमी. त्यातच जर तुम्ही सोने, चांदी दागिणे खरेदी करत असाल तर त्यावर घडणावळ म्हणजे मेकींग चार्जेसही लागतात. त्यामुळे अचूक दरांसाठी आपण आपल्या स्थानिक सोनार अथवा ज्वेलर्सशी संपर्क साधू शकता. (हेही वाचा, Gold Quality and Purity: शुद्ध असूनही 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनवले जात नाहीत, जाणून घ्या कारण)

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील सोने-चांदी दर

मुंबई

22 कॅरेट- 47, 860 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट- 52, 210 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

पुणे

22 कॅरेट- 47,930 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट- 52,240 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

नागपूर

22 कॅरेट- 47,930 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट- 52,240 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

नाशिक

22 कॅरेट- 47,930 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट- 52,240 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

चांदी

चांदी आज प्रति 10 ग्रॅम 624 रुपये दराने विक्री होत आहे.

दागिने बनविण्यासाठी प्रामुख्याने 22 कॅरेट सोन्याचाच वापर होतो. यात काही लोक 18 कॅरेट सोन्याचाही उपयोग करतात. सोने दागिने कॅरेट अनुसार हॉल मार्कचे बनतात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिण्यांवर 999 असा शिक्का असतो. 23 कॅरेट दागिन्यावर 958, 22 कॅरेट दागिन्यावर 916, 21 कॅरेट वर 875 आणि 18 कॅरेट वर 750 लिहीलेले असते. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशन नुसार आपण केवळ एक मिस्ड कॉल देऊनही सोने, चांदी दर जाणून घेऊ शकता. त्यासाठी आपणास 8955664433 या क्रमांकावर एक मिसकॉल द्यावा लागेल.ज्या फोन नंबरवरुन आपण मिस कॉल द्याल त्याच क्रमांकावर आपल्याला हे दर उपलब्ध होऊ शकतील.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement