Gold Rate Today: सोन्याला झळाली, पहा आजचा सराफा बाजारातील दर
सध्या लग्नसराईचे दिवस सुरु झाले असून ग्राहकांची पावले सोनाराच्या दुकानाकडे वळत आहेत. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. आज मुंबईतील सराफा बाजारातील सोन्याच्या दरात तेजी दिसून आली आहे.
सध्या लग्नसराईचे दिवस सुरु झाले असून ग्राहकांची पावले सोनाराच्या दुकानाकडे वळत आहेत. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. आज मुंबईतील सराफा बाजारातील सोन्याच्या दरात तेजी दिसून आली आहे. तर 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅमसाठी आजचा दर 39,880 रुपये झाला आहे. स्थानिक बाजारात सोन्याची मागणी वाढल्याने किंमतीत सुद्धा वाढ झाली आहे.
HDFC सिक्युरिटीजचे सीनिअर अॅनॅलिस्ट तपन पटेल यांच्या म्हणण्यानुसार, रुपया कमजोर झाल्याने सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. रुपयाच्या दरात घसरण झाली की लोक सोन्यामध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देतात. त्यामुळे सोन्याचे दर वाढतात.जागतिक बाजारात डॉलरमध्ये चढउतार झाले की सोन्याच्या दरातही बदल झालेला पाहायला मिळतो.(Gold Shopping: सोने खरेदी करत असाल तर हा नवा नियम नक्की वाचा; बनावट सोने ओळखणे आता होणार सोपे)