Gold Rate Today: सोन्याचा आजचा भाव किती? जाणून घ्या सोने दर
त्यात GST, TST यांसारख्या दरांचा समावेश नाही. सोने, चांदी यांचे मूळ दर वेगळे असतात. त्यात उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्क लागल्याने राज्य आणि प्रांतवार या दरांमध्ये तफावत आढळते.
Gold Rate in MaharashtraToday: भारतात आजचा सोन्याचा दर: 3 ऑगस्ट रोजी, भारतात 10 ग्रॅम पिवळ्या धातूसाठी सोन्याची किरकोळ किंमत अनेक शहरांमध्ये अंदाजे 60,000 रुपये आहे. विशेषत: 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 60,110 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 55,100 रुपये आहे. याउलट, चांदीची किंमत 75,000 रुपये प्रति किलो आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील सोने दरावर नजर टाकता तो पुढीलप्रमाणे मुंबईमध्ये प्रती 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 54,950 रुपये तर 24 कॅरेट सोनेच्या किंमत 59,950 रुपये आहे. पुणे शहरात प्रती 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 54,950 रुपये तर 24 कॅरेट सोनेच्या किंमत 59,950 रुपये आहे. नागपूर मध्येही अनुक्रमे 22 आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत पुण्यामुंबई येवढीच आहे. तर नाशिक शहरात मात्र प्रती 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 54,980 रुपये तर 24 कॅरेट सोनेच्या किंमत 59,950 रुपये इतकी आहे.
सोलापूर, कोल्हापूर, अमरावती, ठाणे, आदी जिल्ह्यामध्येही प्रती 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 54,950 रुपये तर 24 कॅरेट सोनेच्या किंमत 59,950 रुपये इतकी आहे. म्हणजेच एखादा अपवाद वगळता महाराष्ट्रातील सर्व शहरांमध्ये सोने दर समान असल्याचे पाहायला मिळते. (हेही वाचा, Gold Quality and Purity: 22 कॅरेट, 23 आणि 24 Carat सोने म्हणजे काय? तिन्हीमध्ये नेमका फरक काय?)
वर देण्यात आलेले सोने, चांदी दर हे केवळ सूचक आहेत. त्यात GST, TST यांसारख्या दरांचा समावेश नाही. सोने, चांदी यांचे मूळ दर वेगळे असतात. त्यात उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्क लागल्याने राज्य आणि प्रांतवार या दरांमध्ये तफावत आढळते. विविध राज्यांमध्ये उत्पादन शुल्क वेगवेगळे असल्याने राज्यनिहाय सोने, चांदी दरात फरक असू शकतो. कधी हा फरक अधिक असतो कधी कमी. त्यातच जर तुम्ही सोने, चांदी दागिणे खरेदी करत असाल तर त्यावर घडणावळ म्हणजे मेकींग चार्जेसही लागतात. त्यामुळे अचूक दरांसाठी आपण आपल्या स्थानिक सोनार अथवा ज्वेलर्सशी संपर्क साधू शकता.
दागिने बनविण्यासाठी प्रामुख्याने 22 कॅरेट सोन्याचाच वापर होतो. यात काही लोक 18 कॅरेट सोन्याचाही उपयोग करतात. सोने दागिने कॅरेट अनुसार हॉल मार्कचे बनतात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिण्यांवर 999 असा शिक्का असतो. 23 कॅरेट दागिन्यावर 958, 22 कॅरेट दागिन्यावर 916, 21 कॅरेट वर 875 आणि 18 कॅरेट वर 750 लिहीलेले असते. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशन नुसार आपण केवळ एक मिस्ड कॉल देऊनही सोने, चांदी दर जाणून घेऊ शकता. त्यासाठी आपणास 8955664433 या क्रमांकावर एक मिसकॉल द्यावा लागेल.ज्या फोन नंबरवरुन आपण मिस कॉल द्याल त्याच क्रमांकावर आपल्याला हे दर उपलब्ध होऊ शकतील.