सोने ग्राहकांसाठी खुशखबर, मुंबईत सोन्याच्या दरात घसरण
ऐन लग्नसराई आणि गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्ताच्या दोन दिवस अगोदर सोन्याचे दर कमी झाले आहेत.
ऐन लग्नसराई आणि गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्ताच्या दोन दिवस अगोदर सोन्याचे दर कमी झाले आहेत. तसेच गेल्या दोन महिन्यांपासून सोन्याच्या किंमती सातत्याने कमी होताना दिसून येत आहेत. तर गेली दोन दिवससुद्धा सोन्याच्या भावात बरीच घट झाली आहे. त्यामुळे मुंबईत 22 कॅरेट सोन्यासाठी प्रति तोळा 31 हजार रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहेत. तर शुद्ध सोन्यासाठी ( 24 कॅरेट) 33 हजार 155 रुपये मोजावे लागणार आहेत.
तसेच चांदीचे दर प्रति किलो 41 हजार 500 रुपयांवर पोहचला होता. मात्र आता चांदीचा दर 38,300 रुपये आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्याने सोन्या-चांदीच्या किंमतीत घट झाली आहे. बुधवारी सोन्याचे तर 100 रुपयांनी कमी झाले होते. तर आज हेच दर 80 रुपयांनी कमी झाले आहेत. ट्रेडर्सच्या मते आंतरराष्ट्रीय बाजाराचा सोन्याच्या दरावर परिणाम झाला आहे.
न्यूयॉर्क येथे सोन्याचा दर 1293.26 डॉलर प्रति औस असून चांदीसाठी 15.15 डॉलर प्रति औस आहे. तर शुद्ध सोन्याचा दर 80 रुपयांनी कमी झाला असून सध्याचे दर ग्राहकांच्या खिशाला परवडणारे आहेत.