Gold and Silver Rate Today: दिवाळी पूर्वी सोनं, चांदी खरेदीचा विचार करताय? पहा आजचा मुंबई, पुणे सह राज्यातील प्रमुख शहरातील दर
धनतेरस, लक्ष्मी पूजन, दिवाळी पाडवा पूर्वी सोनं खरेदी करणार असाल तर पहा आज मुंबई, पुणे शहरांमध्ये सोन्याचा दर काय?
Gold and Silver Rate In Mumbai, Pune: दिवाळी हा हिंदू धर्मियांसाठी एक मोठा आहे. दिवाळी हा सण मोठा नाही आनंदाला तोटा असं म्हणत सारेच या सणामध्ये सोन्या - चांदी सोबतच मौल्यवान वस्तूंची खरेदी करतात. धनतेरस आणि दिवाळी पाडवा निमित्त तुम्ही देखील यंदा सोनं, चांदी खरेदी करणार असाल तर पहा आज (22 ऑक्टोबर) नेमके सोन्याचे दर काय आहेत? दिवाळी पाठोपाठ लग्न सराई सुरू होत असल्याने पुढील काही दिवसांमध्ये सोने सराफ बाजार तेजीत असेल. अनेक जण गुंतवणूक म्हणून देखील सोन्याचं बिस्कीट, सोन्याचं वळं विकत घेतात. मग त्यासाठी पहा बाजारात आज नेमका सोन्याचा, चांदीचा दर काय आहे? मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर शहरात ग्राहक सणाचा मुहूर्त पाहून सोने खरेदी करतात मग महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये पहा आज नेमका सोने दर काय आहे? Gold Purity Guide: दिवाळीला Gold Coin, वळं, दागिने विकत घेण्यापूर्वी जाणून घ्या 24k, 22k आणि 18k सोन्यातला फरक.
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर शहरातील 24 कॅरेट सोन्याचा दर काय?
मुंबई - ₹ 38,510/ प्रति दहा ग्राम
पुणे - ₹ 38,510/ प्रति दहा ग्राम
नाशिक - ₹ 38,510/ प्रति दहा ग्राम
नागपूर - ₹ 38,510/ प्रति दहा ग्राम
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर शहरातील चांदीचा दर काय?
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर शहरामध्ये आज प्रति 10 ग्राम चांदीचा दर 480 रूपये इतका आहे.
दिवाळी मध्ये धनोत्रयोदशी, लक्ष्मी पूजन यामध्ये सोन्या, चांदीची धन म्हणून पूजा केली जाते. त्यासाठी दरवर्षी प्रथेनुसार आणि आर्थिक कुवती नुसार सोन्या, चांदीची वस्तू विकत घेण्याची प्रथा आहे. तसेच दिवाळी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने त्यादिवशी देखील सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी झुंबड उडते. परिणामी जसा सण आणि मुहूर्त जवळ येतो तसे भाव देखील वाढतात.
हे दर गुड ₹ रिटर्न्स (Good₹Returns) वेबसाईटनुसार दिले आहेत.