Gokul Election Results 2021: गोकुळ दूध संघ निवडणूक निकाल आज होणार जाहीर, कोल्हापूरच्या राजकारणाची किल्ली कुणाकडे? आज फैसला
आजवरचा इतिहास पाहता सर्वसाधारण असे चित्र राहिले आहे की, ज्या पक्षाची अथवा गटाची गोकुळ दूधसंघावर सत्ता त्याच्याकडे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाची किल्ली. आज ही किल्ली कुणाकडे जाते हे गोकुळचा निकाल सांगणार आहे.
कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या गोकुळ दूधसंघावर कोणाची सत्ता याचा आज (4 मे 2021) फैसला होत आहे. गोकुळ दूधसंघ निवडणूक 2021 ( Gokul Dudh Sangh Election 2021) साठी पार पडलेल्या मतदानाची आज मतमोजणी (Gokul Election Results 2021) होत आहे. मतमोजणीचा निकाल काय येतो याकडे कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. गोकुळ दूधसंघ निवडणुकीत कोल्हापूरचे पालकमंत्री-काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) विरुद्ध माजी खासदार-भाजप नेते धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) गट असा सामना रंगला आहे. आजवरचा इतिहास पाहता सर्वसाधारण असे चित्र राहिले आहे की, ज्या पक्षाची अथवा गटाची गोकुळ दूधसंघावर सत्ता त्याच्याकडे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाची किल्ली. आज ही किल्ली कुणाकडे जाते हे गोकुळचा निकाल सांगणार आहे.
गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी रविवारी (2 मे 2021) मतदान पार पडले. या वेळी तब्बल 99.78 मतदान पार पडले. दरम्यान, या निवडणुकीत सतेज पाटील गटाला महाविकासआघाडी तसेच स्थानिक राजकारण यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हसन मुश्रीफ गटाचा पाठिंबा आहे. दुसऱ्या बाजूला माजी खासदार-भाजप नेते धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) गटाला काँग्रेसचे नेते असलेल्या पीएन पाटील गटाचा पाठिंबा आहे. याला स्थानिक राजकारणाची किनार आहे. (हेही वाचा, Gokul Election 2021: गोकुळ निवडणूक आज सकाळपासून मतदानाला सुरुवात, मतदानाकडे राज्याचं लक्ष)
गोकुळ दुधसंघ निवडणूक आकडेवारी
एकूण जागा- 21
उमेदवार- 45
मतदानासाठी पात्र सभासद संख्या- 3650
निवडणुकीतील महत्त्वाचे गट-
1) राजर्षी शाहू आघाडी (सत्ताधारी)
2) राजर्षी शाहू परिवर्तन आघाडी (विरोधक)
राजर्षी शाहू आघाडीतील प्रमुख नेते
- पी एन पाटील (आमदार)
- महादेवराव महाडिक (माजी आमदार)
- धनंजय महाडिक (माजी खासदार,भाजप नेते)
राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीतील प्रमुख नेते
- सतेज पाटील (पालकमंत्री कोल्हापूर)
- हसन मुश्रीफ (ग्रामविकास मंत्री)
दरम्यान, गोकुळ दूधसंघात प्रतिदिन सुमारे 30 ते 35 लाख लिटर दूध संकलन होते. त्यामुळे सहाजिकच दूधसंघाचा विस्तार जिल्हाभर आहे. याशिवाय संपूर्ण महाराष्ट्रात गोकुळ दूध वितरीत केले जाते. दूधसंखाचा व्याप मोठा आहे. वर्षाला कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या या दूधसंघास जिल्ह्याच्या राजकारणात मोठे महत्त्व आहे. त्यामुळे गोकुळ दूध संघावर सत्ता म्हणजे जिल्ह्यात वर्चस्व असा अलिखित प्रघातच गेल्या काही वर्षात पडला आहे. परिणामी गोकुळ दूधसंघ निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.