Pune: पुण्यात फूड डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग; जबरदस्तीनं घेतलं चुंबन, आरोपीला अटक
तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात एफआयआर (FIR) दाखल केला आहे.
पुणे शहर पोलिसांनी (Pune Police) तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी झोमॅटो (Zomato App) फूड डिलिव्हरी बॉयला (Delivery Boy) अटक केली आहे. रईस शेख असे आरोपीचे नाव असून तो कोंढवा येथील रहिवासी आहे. तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात एफआयआर (FIR) दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, तरुणी कामावरुन घरी परतल्यानंतर तिने झोमॅटोवर जेवण ऑर्डर केले होते. अन्नाचे पार्सल दिल्यानंतर आरोपीने मुलीला पाणी देण्याची विनंती केली. मात्र जेव्हा मुलीने त्याला पाणी आणले तेव्हा त्याने तिचा विनयभंग केला. त्या आलेल्या डिलिव्हरी बॉयनं जबरदस्तीनं त्या तरुणीचं चुंबन घेतलं. पोलिसांनी आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम 354 (तरुणीवर विनयभंग करण्याच्या हेतूने) गुन्हा दाखल केला आहे.
तक्रार केलेली तरुणी येवलेवाडी परिसरातील एका नामांकित सोसायटीत राहते. शनिवारी रात्री तिने झोमॅटो ॲप करून जेवण मागवले होते. जेवणाचं पार्सल घेऊन आरोपी रईस शेख रात्री साडे नऊच्या सुमारास तिच्या सोसायटीत आला होता. जेवणाचे पार्सल दिल्यानंतर त्याने तरुणीला पिण्याचे पाणी मागितले. पाणी पिल्यानंतर थँक्यू म्हणण्याचा बहाना करून त्याने तरुणीचा हात हातात घेतला. तरुणीने हात सोडवण्याचा प्रयत्न केला होता. पण आरोपीने हात घट्ट पकडून तरुणीला जवळ ओढले आणि तिच्या गालाचे दोन वेळा चुंबन घेतले. (हे देखील वाचा: Crime: पत्नीशी झालेल्या भांडणातून 7 दिवसांच्या मुलीला पळवले, धावपळीत नवजात जबर जखमी, घटनेनंतर निर्दयी बापाचे पलायन)
पुण्यात घडलेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शहरांमध्ये मोठ्या प्रमणावार फूड डिलिव्हरी ॲपच्या माध्यमातून जेवणाची ऑर्डर दिली जाते. फूड डिलिव्हरी अॅप करणाऱ्या कंपन्या त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत कागदपत्रांची तपासणी करतात का? तसंच या कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी आणि इतिहास माहिती करून घेतात का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने पुन्हा एकदा उपस्थित झाले आहेत.