Ghatkopar Road Accident: घाटकोपर मध्ये भरधाव वेगातील दुचाकीस्वाराच्या धडकेमध्ये तिघांचा मृत्यू

त्यांच्या कुटुंबियांना अपघाताची माहिती देत त्यांनी हॉस्पिटल मध्ये पोस्टमार्टम झाल्यानंतर त्यांचे मृतदेह कुटुंबियांकडे सोपवले.

Accident | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

घाटकोपर (Ghatkopar) मध्ये दुचाकीस्वाराच्या (Two Wheeler) धडकेमध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. घाटकोपरच्या एलबीएस रोड (LBS Road) वर दुचाकीवरून कुर्लाच्या दिशेने भरधाव वेगात जात असताना अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दुचाकी वर असलेले मुझफ्फर हुसेन शाह आणि अहमदी राजा गुलाम मुस्तफा अंसारी या दोघांचा तर रस्ता क्रॉस करणार्‍या सुरेश कराटे या 62 वर्षीय सुरक्षा रक्षकाचाही मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवार (25 मार्च) सकाळची आहे.

बाईक चालक वेगात गाडी चालवत असल्याने तो आणि त्याच्या सह असलेला मित्र दूरवर फेकला गेला आणि त्यामध्ये गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. तर रस्ता क्रॉस करणार्‍या सुरक्षा रक्षकाला भरधाव वेगात असलेल्या दुचाकीची धडक बसल्याने तो देखील फेकला गेला आणि यामध्ये त्याचा मृत्यू झाला. High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून .

जखमींना तातडीने नाजिकच्या लोकांनी घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटल मध्ये नेले परंतू गंभीर जखमी असलेल्या तिघांचाही मृत्यू झाला. मुस्तफा आणि बादशाह हे बाईक वरील दोन युवक अवघे 19 वर्षांचे होते. पण भरधाव वेगात बाईक चालवणं त्यांच्या जीवार बेतलं. ते दोघेही साकीनाका येथील रहिवासी होते. एलबीएस रोड वर साई हॉटेल जवळ पहाटे 4 च्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघात इतका भीषण होता की बाईक सुमारे 70-80 मीटर दुर घासत गेली. सुरेश कराटे हा सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारा व्यक्ती रस्ता क्रॉस करून सार्वजनिक शौचालयामध्ये जात  होता त्यावेळेस समोरून येणार्‍या बाईकने त्याला धडक दिली.

पोलिसांनी नियमानुसार बाईकस्वारांवर FIR नोंदवला आहे. त्यांच्या कुटुंबियांना अपघाताची माहिती देत त्यांनी हॉस्पिटल मध्ये पोस्टमार्टम झाल्यानंतर त्यांचे मृतदेह कुटुंबियांकडे सोपवले.