Ghatkopar Hoarding Collapse: 'घाटकोपर होर्डिंगचा पाया कमकुवत होता, वाऱ्याचा वेग सहन करण्याची क्षमता नव्हती'; VJTI च्या अहवालात समोर आली धक्कादायक माहिती

‘ज्या ठिकाणी होर्डिंग लावले होते ती जागा योग्य नव्हती आणि पाया कमकुवत होता,’ असे अहवालाचा म्हटले आहे. व्हीजेटीआयच्या तांत्रिक तज्ज्ञांनी घटनेनंतर पाया आणि ढिगाऱ्यांचे नमुने गोळा केले होते.

Ghatkopar Hoarding Collapse (Photo Credit : ANI)

Ghatkopar Hoarding Collapse: गेल्या महिन्यात महाराष्ट्रातील मुंबईमधील घाटकोपर (Ghatkopar) येथे एक महाकाय होर्डिंग कोसळून 17 जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडली होती. आता या घटनेच्या चौकशीचा अहवाल समोर आला आहे. एका तंत्रज्ञान संस्थेने आपल्या अहवालात हे होर्डिंग बसवण्यात आलेला पाया कमकुवत असल्याचे म्हटले आहे. अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने बुधवारी पोलिसांना आपला अहवाल सादर केला. या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, शहरात लावण्यात आलेले कोणतेही होर्डिंग ताशी 158 किलोमीटर वाऱ्याचा वेग सहन करण्यास सक्षम असले पाहिजे, परंतु घाटकोपरमध्ये बसवलेले फलक केवळ 49 किलोमीटर प्रति तास वाऱ्याचा वेग सहन करू शकत होते.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, घटनेच्या दिवशी होर्डिंग कोसळले तेव्हा वाऱ्याचा वेग ताशी 87 किलोमीटर होता. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 13 मे रोजी धुळीचे वादळ आणि अवकाळी पावसादरम्यान, घाटकोपर येथे जवळच्या पेट्रोल पंपावर एक मोठा होर्डिंग पडले, त्याखाली दाबून 17 लोकांचा मृत्यू झाला आणि 74 जण जखमी झाले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) वीरमाता जिजाबाई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VJTI) ला होर्डिंग पडण्याचे कारण शोधण्याची विनंती केली होती. संस्थेने बुधवारी आपला अहवाल मुंबई गुन्हे शाखेला सादर केला, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा स्वत: करत आहे. ‘ज्या ठिकाणी होर्डिंग लावले होते ती जागा योग्य नव्हती आणि पाया कमकुवत होता,’ असे अहवालाचा म्हटले आहे. व्हीजेटीआयच्या तांत्रिक तज्ज्ञांनी घटनेनंतर पाया आणि ढिगाऱ्यांचे नमुने गोळा केले होते. (हेही वाचा: Man Jumped From Upper Floor Of Mantralaya: मंत्रालयाच्या वरच्या मजल्यावरून व्यक्तीने मारली उडी; सुरक्षा जाळ्यात अडकला)

होर्डिंगची क्षमता लक्षात घेता, हे सिद्ध होते की, याबाबत संबंधित व्यक्तींकडून (आरोपी) जाणीवपूर्वक निष्काळजीपणा केला गेला. या घटनेनंतर होर्डिंग लावणाऱ्या जाहिरात कंपनीचा संचालक भावेश भिंडे याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, घाटकोपरमध्ये होर्डिंग पडल्याची घटना ताजी असतानाच, आता मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मालाड पश्चिम भागातही मोठे होर्डिंग पडले आहे. ही घटना बुधवारी (5 जून) रात्री घडली. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif