Ghatkopar Hoarding Collapse Case: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी SIT कडून GRP ACP S Nikam यांना समन्स

13 मे रोजी घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला होता तर 75 जण जखमी होते.

Ghatkopar | ANI

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये मुंबई पोलिसांनी स्थापन केलेल्या एसआयटी कडून जीआरपी असिस्टंट कमिशनर S Nikam यांना आज (28 मे) चौकशीसाठी उपस्थित राहण्याचा समन्स बजावण्यात आला आहे. त्यांना आज त्यांचं स्टेंटमेंट रेकॉर्ड करण्यासोबतच काही कागदपत्र सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. होर्डिंग लावण्यासाठी परवानगी देण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये त्यांचं नाव आढळलं आहे. त्यामुळे आता त्यांना जबाब नोंदवण्यासाठी येण्याचा समन्स बजावला आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांच्या चौकशीचा एक भाग म्हणून, त्यांना असे आढळून आले आहे की, ज्या जमिनीवर होर्डिंग उभारण्यात आले होते ती रेल्वेची नव्हती आणि त्याला बृहन्मुंबई महानगरपालिकेची परवानगी आवश्यक होती.

पोलिसही बीएमसीला पत्र लिहून त्यांच्या अधिकारक्षेत्रात कोणतीही कारवाई न करता बेकायदेशीर होर्डिंग कसे उभं होतं याबद्दल प्रश्न विचारणार आहेत. 13 मे रोजी घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला होता तर 75 जण जखमी होते. एसआयटीने होर्डिंगचा मालक भावेश भिंडे याला अटक केली असून, बुधवारपर्यंत तो पोलिसांच्या कोठडीमध्ये आहे. भिंडे यांनी होर्डिंगचे कंत्राट कसे मिळवले आणि त्यातून त्यांनी किती पैसे कमावले याचा तपास पोलिस करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई पोलिस क्राईम ब्रांच कडून घाटकोपरच्या दुर्घटनेत तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे. ज्यामध्ये 6 पोलिसांचा समावेश आहे. एसआयटीने मुख्य आरोपी भावेश भिंडे याच्या निवासस्थानाची तपासणी केली असून तिथून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. त्यांची विविध बँकांमध्ये एकूण 7 बँक खाती आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif