भाजपा उमेदवार पराग शहा, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मधील सर्वात श्रीमंत उमेदवार; संपत्ती 500 कोटी
त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये 78 कोटी स्थावर आणि 422 कोटी जंगम मालमत्ता आहे.
महाराष्ट्रात भाजपाचे माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना डावलून उमेदवारी दिलेले पराग शहा यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मधील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी 500 कोटी संपत्ती असल्याचं जाहीर केलं आहे. पराग शहा (Parag Shah) यापूर्वी नगरसेवक होते. यंदा भाजपाने त्यांना घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गेल्या 5 वर्षाच्या कार्यकाळात 100 टक्के संपत्तीत वाढ, जाणून घ्या किती
50 वर्षीय पराग शाह यांनी व्यवसाय व गुंतवणूक त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत सांगितले आहे. त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये 78 कोटी स्थावर आणि 422 कोटी जंगम मालमत्ता आहे. शाह पती व पत्नी यांचे मिळून तब्बल 299 कोटींचे शेअर्स आहेत. व्यावसायिक, निवासी, कृषी व बिगरकृषी अशा 10 स्थावर मालमत्ता आहेत. महाराष्ट्र व गुजरातमध्ये त्यांच्या नावावर शेतजमीन आहे. सोबत 2 कोटी 6 लाखाचे दागिने, 9 लाखांची स्कोडा कार आणि 2 कोटी 47 लाखांची फरारी गाडी आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: आदित्य ठाकरे 'करोडपती'; 11 कोटी 38 लाखांच्या संपत्तीमध्ये BMW कार, सोनं ते शेत जमिनीचा समावेश
काल मुंबईमध्ये प्रकाश मेहता यांना डावलून पराग शहा यांना उमेदवारी दिल्याने स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये पराग शहा यांच्या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्यानंतर प्रकाश मेहतांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन करत मार्ग मोकळा करून दिला.