Murali Naik Martyred: पाकिस्तानी ड्रोन हल्ल्यात घाटकोपर येथील लष्करी जवान मुरली नाईक शहीद; कुटुंबावर शोककळा

जम्मू भागातील उरीजवळ पहाटे 3:00 वाजता हा हल्ला झाला. यावेळी मुरली नाईक तेथे ड्युटीवर होते. यासंदर्भात फ्री प्रेसने वृत्त प्रकाशित केलं आहे. मूळचे आंध्र प्रदेशातील काफिदंडा गावातील रहिवासी असलेले मुरली नाईक 2022 मध्ये भारतीय सैन्यात सामील झाले होते. त्यांच्या शहीद होण्याने घाटकोपर परिसरात शोककळा पसरली आहे.

Murali Naik Martyred (फोटो सौजन्य - X/@ncbn)

Murali Naik Martyred In India-Pakistan War: मुंबईमधून मोठी बातमी समोर येत आहे. घाटकोपर (Ghatkopar) च्या कामराज नगर येथील रहिवासी असलेले लष्करी जवान मुरली नाईक (23) शुक्रवारी पहाटे पाकिस्तानी ड्रोन हल्ल्यात शहीद (Murali Naik Martyred) झाले. जम्मू भागातील उरीजवळ पहाटे 3:00 वाजता हा हल्ला झाला. यावेळी मुरली नाईक तेथे ड्युटीवर होते. यासंदर्भात फ्री प्रेसने वृत्त प्रकाशित केलं आहे. मूळचे आंध्र प्रदेशातील काफिदंडा गावातील रहिवासी असलेले मुरली नाईक 2022 मध्ये भारतीय सैन्यात सामील झाले होते. त्यांच्या शहीद होण्याने घाटकोपर परिसरात शोककळा पसरली आहे.

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने भारतातील विविध ठिकाणी ड्रोन हल्ले केले होते. 7 मे रोजी भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानी दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. प्रत्युत्तर म्हणून, गुरुवारी रात्रीपासून पाकिस्तानने विविध भारतीय सीमावर्ती भागात ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. या ड्रोन हल्ल्यात घाटकोपमधील मुरली नाईक यांनी आपला जीव गमवला. ( नक्की वाचा: BSF ने उधळला जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा दहशतवाद्यांचा प्रयत्न; सात दहशतवादी ठार (Watch Video).  

दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर मुरली नाईक यांच्या निधनाबद्द शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, 'देशाच्या रक्षणासाठी श्री सत्य साई जिल्ह्यातील पेनुकोंडा विधानसभा मतदारसंघातील गोरंटला मंडल येथील मुरली नाईक नावाच्या सैनिकाच्या निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. देशासाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या शहीद मुरली नायक यांना श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांना मी माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो.'

एन. चंद्राबाबू नायडू यांनी वाहिली श्रद्धांजली - 

स्थानिक संघटना आणि राजकीय नेत्यांनीही वाहिली शहीद सैनिकाला श्रद्धांजली - 

याशिवाय, स्थानिक संघटना आणि राजकीय नेत्यांनीही शहीद सैनिकाला श्रद्धांजली वाहिली आहे. ABVP घाटकोपरने X वर एका पोस्टमध्ये शहीद जवानाला श्रद्धांजली वाहिली, तर भाजप नेते गणेश कुंदर आणि काँग्रेसचे पदाधिकारी धर्मेश जे. सोनी यांनी नाईक यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला. नाईक यांचे कुटुंबीय सध्या आंध्र प्रदेशातील त्यांच्या मूळ गावी राहतात.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement