'हिजडा' शब्द काढा नाहीतर योग्य तिथे बाजार उठवला जाईल; निलेश राणे यांना Gender Activist सारंग पुणेकर यांनी सुनावले
निलेश राणे यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. तसेच, ट्विटरसारख्या सोशल मीडियावरुन निलेश राणे यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा 'हिजडा' असा उल्लेख केला आहे. राणे यांच्या या वक्तव्यावरुन Gender Activist आणि तृथियपंथी भडकले आहेत.
माजी खासदार निलेश राणे यांना Gender Activist सारंग पुणेकर (Sarang Punekar) यांनी सुनावले आहे. गेल्या काही दिवसात निलेश राणे (Nilesh Rane) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यात ट्विटर वॉर रंगले आहे. दरम्यान, ट्विटरवॉरमध्ये निलेश राणे यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. तसेच, ट्विटरसारख्या सोशल मीडियावरुन निलेश राणे यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा 'हिजडा' असा उल्लेख केला आहे. राणे यांच्या या वक्तव्यावरुन Gender Activist आणि तृथियपंथी भडकले आहेत.
काय आहे प्रकरण?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला एक पत्र लिहिले आहे. या पत्रात कोरोना व्हायरस संकटामुळे अडचणीत असलेल्या महाराष्ट्राला तसेच, साखर उद्योगसह इतरही उद्योगांना मदत करण्याची मागणी केली आहे. या पत्रावरुन निलेश राणे यांनी टीका केली आहे. ही टीका करताना राणे यांनी ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले ह्यावर audit झालंच पाहिजे. साखर कारखाने करोडोंची उलाढाल करतात, राज्य सरकार, राज्य बँक, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षों वर्ष साथ देत आलेत. तरी वाचवा??'
दरम्यान, राणे यांच्या पोस्टला प्रत्युत्तर देताना रोहित पवार यांनी म्हटले की, 'मी आपणास सांगू इच्छितो की शरद पवार साहेबांनी साखर उद्योगासह 'कुक्कुटपालन' व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत. साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी' (हेही वाचा, Coronavirus: शरद पवार यांच्यावरील टीकेनंतर रोहित पवार यांचे देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर; आमदार मंगल प्रभात लोढा यांचीही ट्विटर वॉरमध्ये उडी)
सारंग पुणेकर यांचे ट्विट
दरम्यान, निलेश राणे आणि रोहित पवार यांच्यात ट्विटर वॉर सुरु असताना राणे यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा 'हिजडा' असा उल्लेख केला आहे. राणे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ''कोणतरी हिजडा राज्यमंत्री आहे तनपुरे नावाचा ज्याला माझा कार्यक्रम करायचा आहे. असे कार्यक्रम करणारे आम्ही खूप बघितले... समोर आले की पिवळी होते साल्यांची. जागा सांग तनपूरे, येतो मी'', दरम्यान या पोस्टवरुनच Gender Activist सारंग पुणेकर यांनी निलेश राणे यांना सुनावले आहे.
निलेश राणे ट्विट
Gender Activist सारंग पुणेकर यांनी निलेश राणे यांना सुनावताना म्हटले आहे की, ''हिजडा' या शब्दाचा अर्थ माहीत नसेल तर तो मी सांगते. पण आपली बालिशबुद्धी जगावा दाखवू नका. जेव्हा नाकात वेसण नसलेलं हलगट सैरवैरा पळतं, तशी तुमची गत झाली आहे. तोंडाला आळा घाला. हिजडा शब्द मागे घ्या नाहीतर योग्य तिथे बाजार उठवला जाईल, असा इशारा सारंग पुणेकर यांनी दिला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)