GBS Death In Pune: पुण्यामध्ये Guillain Barre Syndrome ची लागण झालेल्या 56 वर्षीय महिलेचा मृत्यू

पुण्यात 56 वर्षीय महिलेच्या मृत्यू पूर्वी पुण्यातून सोलापूरला गेलेल्या एका तरूणाचाही जीबीएस ने मृत्यू झाला आहे.

GBS Death In Pune: पुण्यामध्ये Guillain Barre Syndrome ची लागण झालेल्या 56 वर्षीय महिलेचा मृत्यू
Dead | (Photo credit: archived, edited, representative image)

पुणे (Pune) शहरामध्ये जीबीएस (GBS) ने 56 वर्षीय महिलेचा जीव घेतला आहे. ही महिला सिंहगड परिसरामध्ये राहत होती. ती कॅन्सरग्रस्त देखील होती. 15 जानेवारीला पुण्याच्या ससून रूग्णालयामध्ये (Sassoon Hospital) तिला दाखल करण्यात आले होते. यामध्ये आता तिचा मृत्यू झाला आहे. दरम्यान यापूर्वी पुण्याच्या एका तरूणाचा सोलापूर (Solapur) मध्ये त्याच्या घरी मृत्यू झाला होता. त्यालाही जीबीएस ची लागण झाली होती.

पुण्यामध्ये सध्या जीबीएस चे 127 रूग्ण आहेत. यामध्ये राज्यात आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. सध्या रूग्णांवर तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. पुण्यात विविध भागात जीबीएसचे रुग्ण आढळले असून काही जण व्हेंटिलेटर वर आहेत. सध्या या आजाराची गंभीर दाखल केंद्राने घेतली आहे.  नक्की वाचा: Guillain-Barré Syndrome In Pune: पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमचा प्रादुर्भाव वाढला; चाचणीत शहरातील 'या' 7 ठिकाणाचे पाणी आढळले बॅक्टेरियामुळे दूषित .

गुलेन बॅरी सिंड्रोम हा ऑटोइम्युन आजार असून तो प्रामुख्याने व्हायरल इन्फेक्शननंतर काही आठवड्यांत होतो. सध्या पुणे महानगरपालिकेकडून नागरिकांना पाणी उकळून पिण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसेच शिळे अन्न टाळण्याचा सल्ला दिला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 29, 2025 10:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).