Gas Leak in Tarapur MIDC Factory: तारापूर एमआयडीसीत कारखान्यामध्ये गॅस गळती; परिसरात लाल तपकिरी रंगाच्या धुराचे लोट

यामुळे परिसरातील नागरिकांचा श्वास गुदमला आहे. ज्यामुळे काहींना भोवळ आली. यामुळे या परिसरात चिंतेचे वातावरण परसले आहे.

Photo Credit- X

Gas Leak in Tarapur MIDC Factory: तारापूर एमआयडीसीतील सालवड शिवाजीनगर परिसरात गॅसची गळती झाली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचा श्वास गुदमला आहे. ज्यामुळे त्यांना भोवळ आली. यामुळे या परिसरात चिंतेचे वातावरण परसले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसीतील टी झोनमध्ये येणाऱ्या आरती ड्रग्स कारखान्यातून दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास लाल तपकिरी रंगाचा गॅस बाहेर पडू लागला. यामुळे या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली. या घटनेवेळी सकाळच्या पाळीतील कामगार कारखान्यात होते. त्यांच्या सुटण्याची वेळ झाली होती. (हेही वाचा:Dombivli MIDC Fire: डोंबिवली एमआयडीसी मध्ये महिन्याभरात दुसर्‍यांदा भीषण स्फोट झाल्याने आग (Watch Video) )

त्याशिवाय दुसऱ्या शिफ्टमधले कामगार कारखान्यात दाखल होत होते. दुसऱ्या शिफ्कटमध्ये कामावर रुजू होणाऱ्या कामगारांची संख्या अधिक होती. तसेच शिवाजीनगरमध्ये हा कारखाना रस्त्यालगत असल्यामुळे कारखाना परिसरात जाण्या - येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. गॅस गळतीचा प्रकार घडल्यामुळे अनेकांना ब्रोमिन गॅसचा त्रास जाणवल्याचे चित्र दिसून आले.

दरम्यान, घटना घडल्यानंतर बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. बंबाच्या सहाय्याने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अधिक तपास बोईसर पोलीस करीत असून परिस्थिती आटोक्यात आली आहे.