Gas Cylinder Price: व्यावसायिक गॅस सिलिंडरवरील सवलती बंद, ग्राहकांना मोठा झटका, घ्या जाणून
ही सवलत 8 नोव्हेंबरपासून हटविण्यात येईल.
इंडियन ऑइल ( Indian Oil), भारत पेट्रोलियम (Bharat Petroleum) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (Hindustan Petroleum) या राष्ट्रीय तेल विपणन महामंडळांनी द्रव स्वरुपातील व्यवसायिक इंधन पेट्रोलियम गॅस (LPG) वरील सवलत काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही सवलत 8 नोव्हेंबरपासून हटविण्यात येईल. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निर्देशानुसार, कंपन्यांना हे निर्देश देण्यात आले आहेत. एलपीजी डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशनच्या एका नेत्याने प्रसारमाध्यमांना सांगितले की, आतापासून कोणत्याही व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या ग्राहकांना सवलतीची सुविधा मिळणार नाही.
आतापर्यंत व्यावसायिक गॅस सिलिंडरवर 200 ते 300 रुपयांची सवलत देण्यात येत होती. सरकारी तेल कंपन्यांकडून ही सवलतच आता रद्द करण्यात येणार आहे. व्यावसायिक सिलिंडरवर अधिक सवलती देणाऱ्या वितकरांकडून अनेक तक्रारी येत होत्या. या तक्रारींवर केलेल्या विचारविनिमयानंतर हा निर्णय घेण्यात आला. त्याबाबत सरकारी तेल कंपन्यांनी आदेश दिले आहेत.
दरम्यान, वितराकांना माहिती देताना देशातील तीन सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) आणि HPCL (HPCL) आणि BPCL (BPCL) यांनी सांगितले की, कोणत्याही ग्राहकाला 8 नोव्हेंबरपासून व्यावसायिक गॅस सिलिंडर दरात सवलतीची सुविधा घेता येणार नाही. ती मिळणार नाही. दरम्यान, या निर्णयामुंळे ग्राहकांच्या खिशावर बोजा पडण्याची शक्यता आहे.