Ganpati Visarjan 2022: आज अनंत चतुर्दशी, पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप
बहुतेक घरगुती गणपती विसर्जन ही दीड दिवस, पाच दिवस किंवा गौरीसह विसर्जन केल्या जात. आज बहुदा सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचे विसर्जन असते.
गेल्या दहा दिवसांपासून राज्यभरात गणेशोत्सवाची (Ganeshotsav) धुम सुरु आहे. गेले दोन वर्ष कोरोनाच्या (Corona) पार्श्वभुमिवर गणेशोत्सव थाटामाटात साजरा करता आला नाही पण यावर्षी मात्र लाडक्या बाप्पाचे हे दहा दिवस अगदी दणक्यात साजरे करण्यात आले. तरी आज गणरायाला निरोप देण्याची वेळ आली आहे. आज अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) म्हणजे गणपती विसर्जनाचा (Ganpati Visarjan) दिवस. बहुतेक घरगुती गणपती विसर्जन ही दीड दिवस, पाच दिवस किंवा गौरीसह विसर्जन केल्या जात. आज बहुदा सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचे विसर्जन असते. मुंबई-पुणे (Mumbai Pune) या शहरांमध्ये तर विसर्जन बघायला लांबून लोक येतात. ज्या भक्त गणेशोत्सवा दरम्यान बाप्पाच्या दर्शनाला मुकले ते सगळे आज एकाच वेळी एकाच दिवशी सगळ्या बाप्पाचं दर्शन घेवू शकतात.
मुंबईत (Mumbai) लालबाग (Lalbaug), परळ (Parel) परिसरात अनेक मोठी गणेशोत्सव (Ganeshotsav) मंडळ आहेत. लालबागचा राजा (Lalbaug Cha Raja), गणेश गल्लीचा म्हणजेच मुंबईचा राजा (Ganesh Galli Cha Raja), गिरगावचा राजा (Girgaon Cha Raja), खेतवाडी, चिंचपोकलीचा चिंतामणी (Chinchpokali Cha Chintamani) अशा सर्व गणपतींची आज भव्य विसर्जन मिरवणूक निघेल. यामध्ये मुंबईचा राजा (Mumbai Cha Raja) अर्थात गणेशगल्लीचा गणपती मंडळाचा मान पहिला असतो. सर्वप्रथम मुंबईचा राजा विसर्जन मिरवणूकीसाठी बाहेर पडलेला आहे. त्यानंतर इतर गणेशोत्सव मंडळांचे गणपती विसर्जनासाठी बाहेर पडतील. (हे ही वाचा:- BMC Shriganesh Gaurav Award Competition Result 2022: बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे आयोजित श्रीगणेश गौरव पुरस्कार स्पर्धेचा निकाल जाहीर)
तसेच पुण्यात (Pune) देखील मानाच्या पाच गणपतींसह (Manache Ganpati) श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा (Dagdushheth Halwai Ganpati) आज भव्य विसर्जन सोहळा पार पडतो. गणपती विसर्जनाच्या पार्श्वभुमिवर आज पुण्यात लक्ष्मी रोडवर (Laxmi Road Pune) मोठी गर्दी असते. पुण्यातील सगळे सार्वजनिक मंडळ भागातून विसर्जनासाठी जातात. तरी गर्दी आणि सुरक्षेच्या पार्श्वभुमिवर मुंबईसह पुण्यात मोठा पोलिस (Police) बंदोबस्त करण्यात आला आहे.