गॅंगस्टर अरूण गवळी ला नागपूर मध्यवर्ती न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

दरम्यान यापूर्वीच नवी मुंबईमधील तळोजा कारागृहात आत्मसमर्पण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

अरुण गवळी (Photo Credits-Facebook)

गॅंगस्टर अरूण गवळी (Gangster Arun Gawli ) यांच्या पॅरोलला 5 दिवसांची मुदतवाढ देत पोलिस प्रशासनाकडून प्रवासाची परवानगी घेऊन नागपूरमध्ये सेंट्रल जेलमध्ये हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहे. आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याबाबत आदेश दिले आहेत. दरम्यान यापूर्वीदेखील अरूण गवळी यांनी पॅरोलच्या कालखंडामध्ये वर्तणूक चांगली असल्याचा युक्तिवाद करत पॅरोलचा कालावधी अजून वाढवून देण्याबाबत अर्ज केला होता. मात्र आता तो फेटाळत मुंबई पोलिसांकडून तात्काळ प्रवासाची परवानगी घेऊन नागपूर मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Central Jail) हजर राहण्याचे आदेश ठोठावण्यात आला आहे. दरम्यान मागील आठवड्यात नवी मुंबईमधील तळोजा कारागृहात आत्मसमर्पण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. परंतू   कोव्हिड 19 च्या पार्श्वभूमीवर तळोजा  कारगृहामध्ये त्याला प्रवेश दिला नसल्याचं अरूण गवळीचे वकील मीर नगमन अली यांनी सांगितलं आहे.

अरूण गवळी यांनी पत्नीच्या आजारपणाचं कारण देत 45 दिवस नागपूर कारागृहाबाहेर आहेत. दरम्यान 27 एप्रिलला ते पुन्हा जाणं अपेक्षित होते. मात्र लॉकडाऊनचं कारण देत तो 10 मे पर्यंत वाढवला. पुढे 24 मे पर्यंत पुन्हा वाढ करण्यात आली. मात्र आता यापुढे वाढ होऊ शकत नाही असं सांगत अरूण गवळीला पुन्हा कारागृहात नागपुरमध्ये हजर राहण्याचे आदेश आहेत. या दरम्यान अरूण गवळीची लेक योगिता आणि अभिनेता अक्षय वाघमारे यांचा विवाहसोहळा दगडी चाळीमध्ये पार पडला.

ANI Tweet

मला Corona झाला त्यासाठी माझा बेजबाबदारपणा कारणीभूत आहे; Jitendra Awhad यांनी शेअर केला अनुभव - Watch Video

शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.ही शिक्षा अरूण गवळी नागपूरच्या कारागृहामध्ये भोगत आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 31 मे पर्यंत लॉकडाऊन आहे. या काळात प्रवास करायचा असल्यास पोलिसांकडून खास ई पास घेऊनच परवानगीने प्रवास करण्याची मुभा आहे.