Ganeshotsav ST Buses: एसटी महामंडळ गणेशोत्सवासाठी सोडणार अतिरिक्त बसेस

कोकण ते मुंबईत दरम्यान 200 बसेस सोडणार आहे. या बसेसचा मार्ग कोकण, मुंबई, ठाणे असेल. तसेच कोल्हापूर, कणकवली, रत्नागिरी, सावंतवाडी,मालवण, सांगली, इस्लामपूर, आणि बेलगावी या ठिकाणांसाठी देखील अतिरिक्त बसेस सोडण्यात येणार आहेत.

ST Bus | (Photo Credits: MSRTC)

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं (MSRTC) एक आनंदाची बातमी दिलीय. गणेशोत्सवासाठी (Ganeshostav) गावी जाणाऱ्या गणेश भक्तांची संख्या मोठी असते, यासाठी महाराष्ट्र् राज्य परिवहन मंडळाच्या विविध आगारातून अतिरिक्त बसेस सोडण्यात येत आहेत. कोल्हापूर आगार आणि ते पुणे दरम्यान 15 ते 18 सप्टेंबर या काळात गणेशोत्सवासाठी अतिरिक्त 220 बसेस सोडण्यात येत आहेत. गणेशोत्सवात पुणे ते कोल्हापूर (Pune to Kolhapur) या प्रवासादरम्यान प्रवाशी मोठ्या संख्येने प्रवास करत असतात. यासाठी अतिरिक्त बसेस सोडल्या जाणार आहेत.  कोकण ते मुंबईत दरम्यान 200 बसेस सोडणार आहे. या बसेसचा मार्ग कोकण, मुंबई, ठाणे असेल. तसेच कोल्हापूर, कणकवली, रत्नागिरी, सावंतवाडी,मालवण, सांगली, इस्लामपूर, आणि बेलगावी या ठिकाणांसाठी देखील अतिरिक्त बसेस सोडण्यात येणार आहेत. (हेही वाचा - Marathwada Cabinet Meeting: मराठवाड्यात आज राज्यमंत्रिमंडळाची बैठक, पॅकेज आणि मोठ्या घोषणा होण्याची शक्यता)

कल्याण लोकसभा क्षेत्रातील कोंकण वासियांना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कोकणातल्या प्रवाशासाठी मोफत बस सेवा देण्यात येणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून एकूण 570 एसटी बसेस मोफत उपलब्ध करून दिल्याची माहिती उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी दिली. कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ शहराच्या चौकाचौकातून या बसेस संध्याकाळी मार्गस्थ होणार आहेत.

महामंडळानं 14 सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडल्या आहेत. सदर बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सदर , तसेच खासगी बुकींग एजंट आणि त्यांचे ॲपवर उपलब्ध होणार आहे.

 

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Mahabaleshwar Tourism Festival 2025: येत्या 2 ते 4 मे दरम्यान 'महाबळेश्वर पर्यटन महोत्सवा'चे आयोजन; हेलिकॉप्टर राइड, पॅराग्लायडिंग, तरंगते बाजार, साहसी खेळ, फूड स्टॉल्ससह अनेक कार्यक्रमांचे आयोजन

Women's Safety in MSRTC Buses: एमएसआरटीसी सर्व बसेसमध्ये बसवणार पॅनिक बटणे आणि बस स्टँडवर सीसीटीव्ही कॅमेरे; महिलांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय

Marathi Film Festival 2025: येत्या 21 ते 24 एप्रिल दरम्यान मुंबईत होणार महाराष्ट्रातील पहिलाच आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव; 41 कलाकृती मोफत पाहण्याची संधी, जाणून घ्या सविस्तर

Shirdi Ram Navami 2025 Festival: शिर्डीमधील रामनवमी उत्सवादरम्यान साईबाबा मंदिराला मिळाले 4.26 कोटींचे दान; अडीच लाखांहून अधिक भाविकांनी घेतले दर्शन

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement