गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी BMC ने पहिल्यांदा सांगितले 'Dos & Don’ts', गणपती मंडळांना पालनाचे आदेश; पहा यादी
यानुसार पहिल्यांदाच पालिके अतिशय स्पष्ट्पणे मंडळांना काय करावे आणि काय करू नये या सूचनांची यादी पुरवली आहे.
Ganeshotsav 2019: काहीच दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सव 2019 च्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्व्य समिती द्वारेगणपती मंडळासाठी एक सूचना पत्र जाहीर करण्यात आले आहे. यानुसार पहिल्यांदाच पालिके अतिशय स्पष्ट्पणे मंडळांना काय करावे आणि काय करू नये या सूचनांची यादी पुरवली आहे. वास्तविक सण आणि प्रदूषण या दोन गोष्टी दरवर्षी हातात हात घालून येत असतात, यंदा ही जोडगोळी तोडून प्रदूषणमुक्त उत्साव साजरा करता यावा याकरिता हे पाऊल उचलण्यात आल्याचे समजते. या पत्रकानुसार, समितेने धवनी प्रदूषण टाळण्याची गरज आणि पद्धत अधोरेखित केली आहे. यातही उत्सव काळात गणपती मंडपात धांगडधिंगा घालणारी फिल्मी गाणी लावण्यापेक्षा भक्तिगीते लावण्याचे निर्देश सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (महाराष्ट्रातील तब्बल 17 शहरे प्रदूषित; तातडीने उपाययोजना करण्याची सूचना)
दरवर्षी होणारे धवनी प्रदूषण टाळण्यासाठी, या सूचनापत्रातून समन्व्य समितीने मंडळाला काही नियम सूचित केले आहेत. यातील काही नियम पुढील स्वरूपात असतील:
- गणेश चतुर्थीच्या वेळी चार दिवस मंडळांना मध्यरात्रीपर्यंत लाऊडस्पीकर वापरता येतील. मात्र अन्य आठ दिवस मंडळांनी रात्री 10 वाजता स्पीकर बंद करणे अनिवार्य असणार आहे.
- गणपती मंडळानी आपल्या लाऊडस्पीकर कॉन्ट्रॅक्टर सोबत लेखी करार करून घ्यावा यामध्ये आवाजाची क्षमता नेमून दिल्यानुसार असावी. यानुसार दिवसा आवाज 55 डेसिबल व रात्री 45 डेसिबल इतकी असावी तसेच शांतता क्षेत्रात ही क्षमात दिवसा व राती अनुक्रमें 50 व 40 डेसिबल इतकी असेल. या करारामुळे आवाजाची पातळी वाढल्यास मंडळांऐवजी थेट कॉन्ट्रॅक्टर वर कारवाई करण्यात येईल.
- मंडळांनी आवाज पातळी मोजणारे मोबाईल ऍप घेऊन स्वतः ही यात लक्ष घालावे
- महाराष्ट्रात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळात राजकीय व धार्मिक भावना दुखावणारी विधाने होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
दरम्यान, या पत्रकाची घोषणा करण्याआधी समितीने मुंबई पोलिसांशी बोलून परिस्थतीचा आढावा घेतला होता. मागील पाच वर्षांपासून समाजसेवकांसोबत मिळून पोलिसांनी मंडळात लावण्यात येणाऱ्या लाऊडस्पीकरच्या आवाजाची पातळी नोंदवून घेतली होती. यानुसार , पोलिसांनी मुख्यत्वे मंडळांकडून होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाबाबत समितीकडे काळजी व्यक्त केली.याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा तीव्र आवाजाच्या डीजे सिस्टीम वापरण्याची परवानगी काढून घेतली होती, मात्र त्यानंतरही पोलिसांकडे ध्वनी प्रदूषणाच्या 202 तक्रारी आल्या होत्या त्यामुळे यावेळेस समितीद्वारेच रीतसर सूचना देऊन गणेशमंडळाना त्यांचे पालन करण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत.