Gadchiroli: संपूर्ण उत्तर गडचिरोली नक्षलवादमुक्त मुक्त; पोलिसांची माहिती
आगामी नक्षल सप्ताह (28 जुलै - 03 ऑगस्ट) च्या पार्श्वभूमीवर विध्वंसक कारवाया करण्याचा त्यांचा उद्देश होता.
गडचिरोली पोलिसांनी गुरुवारी सांगितले की, छत्तीसगड सीमेजवळ माओवाद्यांशी झालेल्या भीषण चकमकीत 12 माओवादी ठार झाले व अशाप्रकारे नक्षलवाद्यांच्या संपूर्ण कोरची-टिपागड आणि चातगाव-कसनसूर स्थानिक संघटनात्मक पथकाचा (LOS) सफाया झाल;आ आहे. याद्वारे संपूर्ण उत्तर गडचिरोली सशस्त्र माओवाद्यांपासून मुक्त करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून सात स्वयंचलित शस्त्रांसह अकरा शस्त्रे जप्त केली आहेत. महाराष्ट्र सरकारने ठार झालेल्या 12 माओवाद्यांवर एकूण 86 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले होते.
काल सकाळी एक विश्वसनीय माहिती मिळाली होती की, कोरची-टिपागड आणि चातगाव-कसनसूर संयुक्तचे सुमारे 12 ते 15 सदस्य वांडोली गावातील छत्तीसगड सीमेजवळील जंगल परिसरात तळ ठोकून आहेत. आगामी नक्षल सप्ताह (28 जुलै - 03 ऑगस्ट) च्या पार्श्वभूमीवर विध्वंसक कारवाया करण्याचा त्यांचा उद्देश होता.
त्यानुसार, डीवायएसपी (ऑपरेशन्स) विशाल नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली माओवादी विरोधी C-60 पथकाच्या सात तुकड्या तातडीने जंगलात पाठवण्यात आल्या. पथके परिसरात शोध मोहीम करत असताना, माओवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला, ज्याला C-60 पथकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. अखेर पोलिसांचा वाढता दबाव पाहून माओवादी घनदाट जंगलात पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यानंतर गोळीबार सुरूच राहिला. अखेर सात पुरुष आणि पाच महिला माओवाद्यांना ठार मारण्यात यश आले.
पहा पोस्ट-
या यशस्वी कारवाईबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली पोलिसांचे विशेष अभिनंदन केले आहे. ही कारवाई गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी हालचालींवर निर्णायक आघात करणारी असून, विकासाला प्राधान्य देऊन हिंसाचाराला ठाम विरोध करणे, असे आमचे धोरण असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. गडचिरोली जिल्हा संपूर्णपणे नक्षलमुक्त करण्याचा आमचा निर्धार असल्याचेही त्यांनी सांगितले.