FYJC Admission 1st Merit List 2021: अकरावी प्रवेश प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर, विद्यार्थ्यांनी 11thadmission.org.in वर भेट द्यावी
ही यादी जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांना येत्या 30 ऑगस्ट पर्यंत प्रवेश घ्यायचा आहे.
FYJC Admission 1st Merit List 2021: अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज सकाळी 10 वाजता जाहीर केली जाणार आहे. ही यादी जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांना येत्या 30 ऑगस्ट पर्यंत प्रवेश घ्यायचा आहे. त्यामुळे आता सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष त्यांना पहिल्या यादीत कोणते महाविद्यालय मिळाले आहे याकडे लागले आहे. त्याचसोबत आपल्या पाल्याला इच्छित महाविद्यालय मिळेल का याची चिंता सुद्धा पालकांना लागून राहिली आहे. तर अकरावी प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीसाठी भाग 1 आणि भाग 2 अर्ज हे 22 ऑगस्ट पर्यंत विद्यार्थ्यांकडून भरण्यात आले होते. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी पूर्ण अर्ज भरले आहेत अशा विद्यार्थ्यांना दहावीत मिळालेल्या गुणांच्या आधारावर आज लागणाऱ्या गुणवत्ता यादी मध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे.
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी कट ऑफ लिस्ट बद्दल एक ट्विट केले होते. त्यात त्यांनी म्हटले की, पहिल्या प्रवेश फेरीसाठी कट-ऑप लिस्ट ही 27 ऑगस्टला जाहीर केली जाणार आहे. पहिल्या फेरीनंतर आणखी तीन फेऱ्या पार पडणार आहे. या फेऱ्यांच्या दरम्यान नवीन नोंदणी सुद्धा स्विकारली जाणार आहे. ही फेरी MMR, पुणे, पिंपरी, चिंचवड, नागपूर, अमरावती, नाशिक महामंडळाच्या भागातील अकरावीच्या प्रवेशासाठी असणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.(FYJC Admissions: अकरावी सीईटी परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी करता येणार मोफत रजिस्ट्रेशन)
Tweet:
>>'या 'पद्धतीने विद्यार्थ्यांना मेरिट लिस्ट पाहता येईल-
-विद्यार्थ्यांनी प्रथम अधिकृत वेबसाइट 11thadmission.org.in येथे भेट द्यावी.
-आता लिस्टमधील Region निवडावे.
-तुम्हाला एका नव्या पेजवर नेले जाईल.
-येथे तुम्हाला लॉगिन इन करण्यासाठी ID आणि Password द्यावा लागणार आहे.
-विद्यार्थ्यांना आता 11वी च्या पहिल्या मेरिट लिस्टबद्दलचे स्टेटस स्क्रिनवर दिसून येईल.
-मेरिट लिस्टची यादी तुम्ही डाऊनलोड करु शकता.
तर दुसऱ्या गुणवत्ता यादीची प्रवेश प्रक्रिया 31 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून, याबाबतचे सविस्तर वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाईल, असे विभागाने म्हटले आहे. त्याचसोबत प्रवेशाची तिसरी फेरी ही 5-11 सप्टेंबर, चौथी फेरी ही 12-17 सप्टेंबर मध्ये पार पडणार आहे.