Gangster Chhota Shakeel' Brother-in-law Died: गँगस्टर छोटा शकीलचा मेहुणा आरिफ शेख उर्फ आरिफ भाईजान याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
मुंबईतील आर्थर रोड कारागृहात कैदी (Custody Death) असलेला 63 वर्षीय शेख यास शुक्रवारी (21 जून) श्वासोच्छवासाचा त्रास आणि छातीत दुखू लागल्याने जेजे रुग्णालयात दाखल केले.
अंडर्लवर्ड डॉन दाऊद इब्राहीम (Dawood Ibrahim) याचा हस्तक आणि कुख्यात गँगस्टर आणि फरारी गुंड छोटा शकील (Chhota Shakeel) याचा मेहुणा आरिफ भाईजान या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आरिफ अबुबकर शेख (Arif Abubakar Shaikh) याचे निधन झाले आहे. मुंबईतील आर्थर रोड कारागृहात कैदी (Custody Death) असलेला 63 वर्षीय शेख यास शुक्रवारी (21 जून) श्वासोच्छवासाचा त्रास आणि छातीत दुखू लागल्याने जेजे रुग्णालयात दाखल केले. या वळी उपचार सुरु असतानाच निधन झाले. दरम्यान, शेख याचा नातेवाईक असलेल्या आरिफ खान यांनी प्रसारमाध्यांना दिलेल्या माहितीमध्ये म्हटले की, आमच्या माहितीनुसार त्याची प्रकृती चांगली होती. अधिकाऱ्यांनी आम्हाला त्याच्या आरोग्याबद्दल काहीही माहिती दिली नाही. अद्यपही ते आम्हाला काहीही बोलत नाहीत. त्याच्याविषयी आम्ही सर्व माहिती जेजे हॉस्पिटलमधून गोळा केली.
राष्ट्रीय तपास संस्थेकडून मे 2023 मध्ये अटक
आरिफ शेख आणि त्याचा भाऊ शब्बीर शेख यांना राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) मे 2023 मध्ये फरारी गुंड दाऊद इब्राहिम कासकर आणि छोटा शकीलसह त्याच्या अनेक जवळच्या साथीदारांचा समावेश असलेल्या टेरर फंडिंग प्रकरणात अटक केली होती. दाऊदच्या संघटित गुन्हेगारी सिंडिकेट, डी-कंपनीशी त्याचा सहभाग असल्याचे कारण देत विविध न्यायालयांनी शेखचा जामीन अर्ज नाकारला होता. (हेही वाचा, एनआयएने जाहीर केले Dawood Ibrahim वर 25 लाख, तर त्याचा साथीदार Chhota Shakeel वर 20 लाखांचे रोख बक्षीस)
दहशतवादी संघटनांशी संपर्क असल्याचा संशय
NIA ने फेब्रुवारी 2022 मध्ये दाऊद, त्याचा भाऊ अनीस आणि छोटा शकील यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा नोंदवला. या आरोपांमध्ये शस्त्रास्त्रांची तस्करी, अंमली पदार्थ-दहशतवाद, मनी लाँड्रिंग, बनावट भारतीय नोटा चलनात आणणे आणि इतर गुन्ह्यांचा समावेश आहे. दहशतवादी निधी उभारण्यासाठी मालमत्ता संपादन केल्याचा आणि लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि अल कायदा यांसारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी सहकार्य केल्याचाही त्यांच्यावर आरोप होता.
हसिना पारकर हिच्या मृत्यूनंतर सांभाळला टोळीचा कारभार
शेख, त्याचा भाऊ आणि मोहम्मद सलीम कुरेशी, ज्याला सलीम फ्रूट म्हणूनही ओळखले जाते, यांच्यावर दहशतवादी कारवायांसाठी निधी देण्यासाठी डी-कंपनीच्या नावाने मालमत्ता व्यवहार आणि विवाद सेटलमेंटद्वारे मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचा आरोप आहे. दाऊदची बहीण हसिना पारकर हिच्या मृत्यूनंतर सिंडिकेटचा कारभार हाती घेतल्याच्या आरोपावरून कुरेशीला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अटक करण्यात आली होती. (हेही वाचा, अंडरवर्ल्ड डॉन Dawood Ibrahim सोबत कौटुंबिक संबंध 'अभिमानाचे' म्हणत EX-Pak cricketer Javed Miandad ने दिली जाहीर कबुली (Watch Video))
एक्स पोस्ट
याव्यतिरिक्त, एनआयएने बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा 1967 च्या कलम 25 (1) अंतर्गत मंगल नगर, मीरा रोड येथील गौरव ग्रीन कोऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमधील शेखचा फ्लॅट दहशतवादाची कमाई म्हणून जप्त केला होता.