Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणी चौथा आरोपी विष्णू चाटेला बीडमध्ये अटक
त्याच्या अटकेमुळे ताब्यात घेतलेल्या संशयितांची एकूण संख्या चार झाली आहे. अद्याप तीन जण फरार आहेत. चाटे यांच्यावर देशमुख यांच्या हत्येचा प्लान केल्याचा आरोप असून यापूर्वी पवनचक्की कंपनीकडून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Santosh Deshmukh Murder Case: मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) मोठे अपडेट समोर आले आहे. राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष विष्णू चाटे (Vishnu Chate) ला बीड (Beed) मध्ये अटक (Arrest) करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून जात असताना चाटे याला बीड येथील लक्ष्मी चौकाजवळ पकडण्यात आले. त्याच्या अटकेमुळे ताब्यात घेतलेल्या संशयितांची एकूण संख्या चार झाली आहे. अद्याप तीन जण फरार आहेत. चाटे यांच्यावर देशमुख यांच्या हत्येचा प्लान केल्याचा आरोप असून यापूर्वी पवनचक्की कंपनीकडून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
देशमुख यांच्या हत्येनंतर पोलिसांनी चाटे यांच्यासह सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. पवनचक्की कंपनीकडून खंडणीच्या तक्रारीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड, चाटे आणि अन्य एका व्यक्तीचा समावेश आहे. तपासात खंडणी आणि खून प्रकरणांमध्ये चाटे याचा संबंध असल्याचे समोर आले आहे. गेल्या आठवड्यात पवनचक्की कंपनीच्या कार्यालयाबाहेर झालेल्या बाचाबाचीनंतर देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. तथापी या प्रकरणातील फरार संशयितांमध्ये सुदर्शन घुले हा वाल्मिक कराडचा निकटवर्तीय आहे. (हेही वाचा -Santosh Deshmukh Murder Case: बीडच्या मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांचा अपहरणानंतर खून; संतप्त स्थानिकांचे अहमदनगर अहमदपूर महामार्गावर रस्ता रोको)
काय आहे नेमक प्रकरण?
केज तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. एका पवनचक्की कंपनीकडून 2 कोटी रुपये उकळण्याचा प्रयत्न हाणून पाडल्याप्रकरणी देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. हत्या करण्यात आलेले सरपंच हे मराठा समाजाचा असल्याने या हत्येचे राजकारण करण्यात येत असून विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला आहे. तथापी, राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाचीही घोषणा केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना असट केली असून अद्याप चार आरोपी फरार आहेत. (हेही वाचा - Pune Shocker: पुण्यात भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाची हत्या, शहरात खळबळ.
दरम्यान, संतोष देशमुख खून प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. मंगळवारी विधानभवनाबाहेर बोलताना शिवसेनेचे (यूबीटी) नेते अंबादास दानवे म्हणाले की, परभणी आणि बीडमध्ये कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. या हत्येला धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड जबाबदार आहे. कराड यांच्यावर 2 कोटी रुपयांची खंडणी घेतल्याचा आरोपही आहे. सध्या जिल्ह्यात भीतीचे वातावरण आहे. बीडमध्ये कायदा व सुव्यवस्थेची भावना निर्माण करण्यासाठी सरकारमधील काही जबाबदार मंत्र्यांनी पालकमंत्री म्हणून जिल्ह्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.