Anil Deshmukh Grants Bail: अनिल देशमुख यांना ईडी प्रकरणात जामीन मंजूर, मात्र सीबीआय प्रकरणात मुक्काम तुरुंगातच

मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना 1 लाख रुपयांच्या वैयक्तीक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला

Anil Deshmukh | (Photo Credits: ANI)

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अनिल देशमुख (Anil Deshmukh Grants Bai) यांना मनी लॉन्ड्रींग प्रकरणात (Money Laundering Case) जामीन मंजूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना 1 लाख रुपयांच्या वैयक्तीक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. याशिवाय तपास यंत्रणांना पूर्णपणे सहकार्य करण्याचे आणि साक्षी पुराव्यांशी कोणत्याही प्रकारे छेडछाड करण्याचा प्रयत्न करु नये, असेही न्यायालयाने त्यांना बजावले आहे. शंभर कोटी रुपये वसुलीच्या आरोपाखाली अनिल देशमुख यांची चौकशी सुरु होती.

मनी लॉन्डींग केल्याचा अनिल देशमुख यांच्यावर आरोप होता. याच आरोपाखाली अंमलबजावणी संचालनालयाने त्यांना अटक केली होती. अनिल देशमुख यांना अटक करण्यात आल्यानंतर सुरुवातीला काही काळ ते सीबीआय कोठडीत होते. नंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत ठोठावण्यात आली होती. त्यानंतर तब्बल 11 महिन्यांनंतर देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे.

दरम्यान, अनिल देशमुख यांना जामीन मंजूर मिळाला असला तरी त्यांचा मुक्काम कारागृहातच असणार आहे. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यासंदर्भात काही प्रकरमांमध्ये  सीबीआयने दाखल असलेली प्रकरणे अद्यापही न्यायालयात प्रलंबीत आहेत. त्यामुळे त्या प्रकरणामध्ये त्याना जामीन मिळाला नाही. त्यामुळे ईडीप्रकरणांतून जामीन मंजूर झाला असला तरी त्यांचा मुक्काम कारागृहातच असणार आहे. (हेही वाचा, Supreme Court: विकासकाला भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनीवर बांधलेले फ्लॅट हस्तांतरित करण्यासाठी NOC आवश्यक नाही: उच्च न्यायालय)

अनिल देशमुख यांना जवळपास 11 महिन्यानंतर जामीन मिळाला आहे. 100 कोटी वसूली प्रकरणी अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते न्यायालयीन लढा देत आहेत. न्यायालयाने अनिल देशमुख यांना 1 लाख रुपयांच्या वैयक्तीक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. याशिवाय तपास यंत्रणांना पूर्णपणे सहकार्य करण्याचे आणि साक्षी पुराव्यांशी कोणत्याही प्रकारे छेडछाड करण्याचा प्रयत्न करु नये, असेही न्यायालयाने त्यांना बजावले आहे.

अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आनंदाचे वातावरण आहे. अनिल देशमुख यांच्या जामीनावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, हा सत्याचा विजय आहे. अनिल देशमुख हे निर्दोशच होते. त्यांना प्रकरणात गोवण्यात आले. न्यायालाने त्यांना जामीन मंजूर केला. याबद्दल न्यायालयाचे आभार. आम्ही यापुढेही असेच सत्याची बाजू घेऊन लढू. आता अनिल देशमुख यांना जामीन मिळाला आहे. यापुढे आम्ही एकनाथ खडसे यांचे जावई, संजय राऊत आणि नवाब मलिक यांना जामीन मिळविण्यासाठीही लढू, अशा भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे की, सत्य परेशान हो सकता है. पराजीत नव्हे. तुम्ही सत्याला अडचणीत आणू शकता. त्याला पराभूत करु शकत नाही, अशा भावना अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली आहे.