Dilip Gandhi Passes Away: भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांचे दिल्लीत निधन

सुरुवातीला नगरसेवक असलेले पुढे खासदार झाले आणि केंद्रात मंत्रीही. अहमदनगर महानगरपालिकेतून राजकीय कारकीर्दीस सुरुवात केलेल्या गांधी यांच्याकडे अल्पावधीतच नगरपरिषदेत भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व आले.

Dilip Gandhi | (Photo Credits: Facebook)

दिलीप गांधी यांचे निधन (Dilip Gandhi Passes Away) झाले आहे. ते 69 वर्षांचे होते. दिलीप गांधी (Dilip Gandhi) हे भारतीय जनता पक्षाकडून अहमदनगर (Ahmednagar) विधानसभा मतदारसंघातून लोकसभेवर खासदार राहिले होते. तसेच, ते केद्रात काही काळ मंत्रीही होते. प्रदीर्घ काळापासून प्रकृती अस्वास्थ्याशी झुंजत असलेल्या दिलीप गांधी यांच्यावर दिल्ली येथे उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आज (बुधवार 17 मार्च) पहाटे त्यांचे निधन झाले.

दिलीप गांधी हे राजकारणात अगदी तळागाळातून वर आले होते. सुरुवातीला नगरसेवक असलेले पुढे खासदार झाले आणि केंद्रात मंत्रीही. अहमदनगर महानगरपालिकेतून राजकीय कारकीर्दीस सुरुवात केलेल्या गांधी यांच्याकडे अल्पावधीतच नगरपरिषदेत भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व आले. 1585 मध्ये ते अहमदनगर महापालिकेत उपाध्यक्ष झाले.भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवरही त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या.

अटलबीहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात दिलीप गांधी हे केंद्रीय मंत्री होते. लोकसभा निवडणूक 1999 मध्ये खासदार म्हणून निवडून गेल्यावर गांधी यांच्याकडे केंद्रीय जहाज वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी होती. 29 जानेवारी 2003 ते 15 मार्च 2004 या काळात ते केंद्रीय जहाज वाहतूक मंत्री राहिले. मात्र, लोकसभा निडणूक 2004 मध्ये झालेल्या लोसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार तुकाराम गडाख यांनी गांधी यांचा पराभव केला.

दरम्यान, लोकसभा निवडणूक 2009 आणि 2014 मध्येही ते लोकसभेवर निवडूण गेले. परंतू, लोकसभा निवडणूक 2019 मध्ये भाजपने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्या ऐवजी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या सुजय विखेंना उमेदवारी मिळाली. तेव्हापासून ते काहीसे राजकीय विजनवासात गेले होते.