भाजपच्या माजी आमदाराने घेतली राज ठाकरे यांची भेट; विधानसभा निवडणुकीत पक्षाने कापलं होतं तिकीट
त्यामुळे अनेकदा राजकीय नेत्यांनाही त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी असा प्रश्न पडतो, अशी भावना अनेकदा राजकीय विश्लेषक व्यक्त करतात.
कोथरुड विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या माजी मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni meet Raj Thackeray) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कोथरुड विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार असतानाही भाजपने विधानसभा निवडणूक 2019 मध्ये मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापले होते. त्यांच्या ऐवजी या मतदारसंघातून पालकमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना तिकीट देण्यात आले. त्यामुळे कुलकर्णी नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, कुलकर्णी यांनी स्वत: या भेटीबाबत स्पष्टीकरण दिले. त्यामुळे सुरु झालेल्या चर्चांवर पडदा पडला.
दरम्यान, राज ठाकरे यांच्याशी झालेली भेट ही राजकीय नव्हती. तर, आपण आपल्या मुलीच्या विवाहाचे निमंत्रण देण्यासाठी राज यांची भेट घेतल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्राचे सध्याचे राजकारण पाहता वेगवेगळ्या पक्षांतील दोन नेते एकमेकांना भेटले की, लगेच त्याच्या बातम्या बनतात. त्यामुळे अनेकदा राजकीय नेत्यांनाही त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी असा प्रश्न पडतो, अशी भावना अनेकदा राजकीय विश्लेषक व्यक्त करतात. (हेही वाचा, उद्धव ठाकरे घेणार गोपीनाथ गडावर महायुतीचे शिल्पकार गोपिनाथ मुंडे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन?)
दरम्यान, मेधा कुलकर्णी या विधानसभा निवडणूक 2014 मध्ये भाजपच्या तिकीटावर कोथरुड विधानसभा मतदारसंघातून निवडूण आल्या होत्या. मात्र, विधानसभा निवडणूक 2019 मध्ये पक्षाने त्यांचे तिकीट कापल्यामुळे त्या काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले होते. मात्र, पक्षादेश आपणास मान्य असून, आपण चंद्रकांत पाटील यांचा प्रचार करणार असल्याचे कुलकर्णी यांनी जाहीर केले होते. आता भाजप त्यांचे पुनर्वसन कसे करणार याकडे पुण्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.