Deepali Chavan Suicide: वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांची आत्महत्या, पिस्तूलातून स्वत:वर झाडली गोळी

अवघ्या पाच वर्षांपूर्वीच त्या (2015) महाराष्ट्र वनसेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या.

Suicide | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

अमरावती (Amravati) वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण (FRO Deepali Chavan) यांनी पिस्तूलातून स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केल्याची घटना पुढे आली आहे. दिपाली चव्हाण ( Deepali Chavan) या मेळघाट व्याग्र प्रकल्पाच्या कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सेवेत कार्यरत होत्या. त्यांनी शासकीय निवासस्थानी आत्महत्या केली. आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, वरिष्ठांकडून टाकला जाणारा दबाव आणि मानसिक त्रास आदी कारणांमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आज (25 मार्च) सायंकळी 5.30 च्या सुमारास त्यानी आत्महत्या केली. त्यांच्या निवासस्थानातून गोळी झाडल्याचा आवाज आल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतील. या वेळी त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढलले.

घटनास्थळी असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तातडीने या घटनेची माहिती धारणी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दिपाली चव्हाण यांचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी केलेल्या तपासात चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली 9 पानांची चिठ्ठी सापडल्याचे समजते. पोलीसांनी ही चिठ्ठी ताब्यात घेतली आहे. या चिठ्ठिमध्ये आत्महत्येच्या कारनांचा नेमके कारण असण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Babita Phogat's Sister Commits Suicide: धक्कादायक! कुस्तीचा अंतिम सामना गमावल्यानंतर बबीता फोगाटच्या बहिणीची आत्महत्या)

मराठवाड्यातील रहिवासी असलेल्या दिपाली चव्हाण यांनी राजेश मोहिते यांच्यासोबत दोन वर्षांपूर्वीच विवाह केला होता. राजेश मोहिते हे अमरावती जिल्ह्यात लोणी टाकळी येथील रहविवासी आहेत. सध्या ते अमरावती जिल्हा कोषागार कार्यालयात कर्तव्यास आहेत. दिपाली चव्हाण यांना एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जात असे. अवघ्या पाच वर्षांपूर्वीच त्या (2015) महाराष्ट्र वनसेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या.

दरम्यान, पोलिसांनी चव्हाण यांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. घटनास्थळावर पंचनामा केल्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह धारणीच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे. उत्तरीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांकडे सुपूर्त केला जाईल.