Thane: पती आणि सासरच्या मंडळींकडून 21 वर्षीय महिलेचा जबरदस्तीने गर्भपात; गुन्हा दाखल
पीडिता भिवंडीत असताना तिची हत्या करण्यासाठी तिला विष प्यायला लावले.
Thane: ठाण्यात 21 वर्षीय महिलेचा बळजबरीने गर्भपात केल्याप्रकरणी तिचा पती आणि चार नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिवंडी (Bhiwandi) येथील नारपोली पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद कुंभार यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या तक्रारीवरून बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात प्रथम 'झिरो एफआयआर' नोंदवण्यात आली होती. कारण, पीडित महिला त्या अधिकारक्षेत्रातील होती.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, महिलेचा पती आणि सासरच्या चार जणांनी 2021 मध्ये बळजबरीने तिचा गर्भपात केला. पीडिता भिवंडीत असताना तिची हत्या करण्यासाठी तिला विष प्यायला लावले. (हेही वाचा - Beed News: बीड मध्ये शिक्षकाची आत्महत्या, काही जण धमकी देत असल्याने उचलले टोकाचे पाऊल)
पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 307 (हत्येचा प्रयत्न) आणि 313 (महिलेच्या संमतीशिवाय गर्भपात करणे) या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. आशा उर्फ योगिता योगेश पाटील, गोपाळ प्रकाश पाटील, मंगला प्रकाश पाटील, प्रकाश तुळशीराम पाटील आणि फिर्यादीचे पती सागर पाटील अशी या पाच जणांची नावे आहेत.
महिला आणि अन्य आरोपी यांच्यातील नातेसंबंध पोलिसांनी स्पष्ट केले नाहीत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले.