सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा पूरपरिस्थिती; कृष्णा नदीच्या पातळीत वाढ, प्रशासनाकडून सतर्क राहण्याचा इशारा

कृष्णा नदीच्या (Krishna River) पातळीत वेगाने वाढ होऊ लागल्यामुळे प्रशासनाने (Administration) नदी लगतच्या परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा (Alert) इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात एनडीआरएफ जवानाचे 2 पथक दाखल करण्यात आले आहे.

Sangali Flood (Photo Credits: Twitter)

सांगली (Sangli District) जिल्ह्यात पुन्हा एकदा पूरपरिस्थितीचा धोका निर्माण होऊ लागाला आहे. कृष्णा नदीच्या (Krishna River) पातळीत वेगाने वाढ होऊ लागल्यामुळे प्रशासनाकडून (Administration) नदी लगतच्या परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा (Alert) इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात एनडीआरएफ जवानाचे 2 पथक दाखल करण्यात आले आहे. पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) व्यक्त केली आहे. तसेच शहरातील काही भागात पूर परिस्थिती उद्धभवण्याची शक्यता जास्त आहे. यावर्षीच्या पावसाने कोल्हापूर (Kolhapur District), सांगली आणि कोकण (Kokan District)जिल्ह्यात धूमाकूळ घातला आहे.

मुसळधार पावसाने कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला झोडपून काढले आहे. गेल्या काही दिवसापूर्वी मुसळधार पाऊसामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात भयंकर पूर आला होता. यामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. परंतु, या परिस्थितीतून पूर्णपणे सावरले नसताना पुन्हा एकदा या परिसरातील नागरीकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. नदीकाठच्या भागात राहणाऱ्या लोकांचे स्थलांतर करण्यास सुरूवात झाली आहे. नागरिकांच्या सुरक्षतेसाठी एनडीआरएफ जवानांचे 2 पथक संबधित भागात दाखल करण्यात आले आहे. तसेच सांगलीत आयर्विन पुलाच्या पाण्याची पातळी 30 फुटांवर पोहोचली आहे. यामुळे शहरातील इनामदार प्लॉट, सूर्यवंशी प्लॉट आणि दत्तनगर परिसरात पूरस्थिती उद्धभवण्याची शक्यता जास्त आहे. हे देखील वाचा-कोल्हापूर: राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे उघडले, नद्यांना पूर; परिसरात हाय अलर्ट, एनडीआरएफचे जवान तैनात

कृष्णा नदी काठाच्या राहणाऱ्या रहिवाशांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठावरील लोकांनी घाबरून जाऊ नये. मात्र, सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विशेषतः वाळवा, शिराळा, मिरज, पलूस तालुक्यातल्या तसेच नदीकाठावरील आणि सखल भागातल्या लोकांनी सावधानता बाळगावी.