IPL Auction 2025 Live

Thane: खाडीमध्ये खेकडे पकडण्यासाठी गेलेली पाच मुले अडकली, आठ तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुखरुप सुटका

मुले अडकल्याची माहिची मिळताच, बचावकार्य सुरु झाले. पाच मुलांपैकी बहुतेक १२ वर्षाचे आहे.

thane Shocker PC TW

Thane: महाराष्ट्रातील ठाणे शहरात असलेल्या खाडीत खेकडे पकडण्यासाठी गेलेली पाच मुले अडकल्याची माहिती समोर आली. मुले अडकल्याची माहिची मिळताच, बचावकार्य सुरु झाले. पाच मुले बहुतेक 12 वर्षाचे आहे. आठ तासांचा अथक प्रयत्नानंतर टीडीआरएफच्या 25 जवानांच्या पथकाने पाचही मुलांची सुखरुप सुटका केली. (हेही वाचा- दारूच्या नशेत तरुणीचा हात धरल्याबद्दल लोकांनी केली बेदम मारहाण, पुढे जे झाले ते वाचून बसेल धक्का)

''आझाद नगर भागातील दर्गा गल्लीतील पाच मुले सायंकाळी पाचच्या सुमारास मुंब्रा टेकडीवरील खाडी मशीन परिसरात खेकडे पकडण्यासाठी गेली होती. पण ते मार्ग चुकले. त्यावेळी त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केला, परंतु ते सापडले नाहीत त्यामुळे अग्निशमन दलाला या बाबत माहिती दिली.

ठाणे महानगरपालिकेच्या टीएसी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे आरडीएमसी प्रमुख यासिन तडवी यांनी सांगितले.  मुले अकडल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. मुलांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर मुलांने सापडले आणि त्यांची सुटका करण्यात आली.