Japanese Encephalitis चा पहिला रूग्ण पुण्यामध्ये; PMC कडून बाळाच्या रक्ताचे, डासांसह प्राण्यांचेही नमुने NIV कडे

सध्या ससून हॉस्पिटल मध्ये त्याच्यावर उपचार सूरू आहेत.

Fever | Pixabay.com

कोरोना व्हेरिएंट, गोवर यांच्यानंतर पुण्यात आता Japanese Encephalitis चा रूग्ण आढळला आहे. पुणे महानगर पालिकेकडून गुरूवारी (1 डिसेंबर) 18 कुत्रे आणि डुक्करांचे नमुने National Institute of Virology कडे पाठवले आहेत. दरम्यान 4 वर्षाचं एक बाळ Japanese Encephalitis पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याला ससून रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. हॉस्पिटलनेही 3 नोव्हेंबरला त्याला दाखल केलं असल्याचं सांगितलं आहे.

आरोग्य विभागाकडून घेण्यात आलेल्या उपायाच्या पार्श्वभूमीवर Dr Sanjeev Wavare पालिकेचे असिस्टंट हेल्थ चीफ यांनी आपण मुलाच्या ब्लड सॅम्पल सह घरात काम केलेल्या 7 लोकांचे आणि 16 शेजार्‍यांचेही सॅम्पल पाठवण्यात आले आहेत. रॅपिड फीव्हर सर्व्हे मध्ये आजुबाजूच्या 480 घरांची तपासणी केली आहे.

एनआयवी कडे डासांचे नमुने देखील पाठवण्यात आले आहेत. डासांची उत्पत्ती टाळण्यासाठी साचलेले पाणी काढणं, कीटकनाशक मारणं हे करण्यात आलं आहे.

मुलाला लहान मुलांच्या वॉर्ड मध्ये Intensive Care Unit मध्ये दाखल केले आहे. मुलाला ताप, डोकेदुखी, अशक्तपणा जाणवत आहे. सध्या त्याच्यावर उपचार आणि पुढील तपासण्या सुरू आहेत. सुरूवातीला 9 दिवस बाळ व्हेंटिलेटर वर होते. 17 दिवस आयसीयू मध्ये राहिल्यानंतर आता त्याला सामान्य वॉर्ड मध्ये हलवण्यात आले आहे.

Japanese Encephalitis (JE)म्हणजे काय?

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, Japanese Encephalitis (JE)हा डेंग्यू, पिवळा ताप आणि वेस्ट नाईल व्हायरसशी संबंधित फ्लेविव्हायरस आहे. हा डासांमुळे पसरतो. बरेच रूग्ण माईल्ड असतात. अपवादात्मक स्थितीमध्ये यात मेंदूला सूज येणं, अचानक डोकेदुखी, उच्च ताप ही लक्षणं आढळतात.