पुणे: पत्ता माहित असूनही न सांगितल्याच्या रागात तरुणावर गोळीबार

साधारणपणे उत्तर भारतात घडणाऱ्या घटना आता महाराष्ट्रात आणि ते ही पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात घडू लागल्या आहेत.

Shooting | Representational Image | (Photo Credits: GoodFreePhotos)

साधारणपणे उत्तर भारतात घडणाऱ्या घटना आता महाराष्ट्रात आणि ते ही पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात घडू लागल्या आहेत. एका शुल्लक कारणावरुन तरुणावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना सध्या पुण्यातून समोर आली आहे. सनी चौधरी असं गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. केवळ विचारलेला पत्ता न सांगण्यावरुन ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून अजून दोघांचा तपास सुरु आहे.

लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी अहमदनगरचे असून ते कारने प्रवास करत होते. त्यांना हॉटेल प्यासाला जायचे होते. मात्र रस्त्यात त्यांनी सनी चौधरीला पत्ता विचारला. सुरुवातीला त्याने आपल्याला पत्ता माहित नसल्याचे सांगितले. पण जेव्हा कारमधील व्यक्तींनी तुला कुठे सोडायचं असेल तर सोडतो, असं सांगितल्याने त्याने हॉटेलचा पत्ता ठाऊक असल्याचे सांगितले. यामुळे तिघे आरोपी चिडले आणि पत्ता माहित असूनही न सांगितल्याने त्याला धमकावू लागले. त्यानंतर त्यांनी त्याच्या पायावर गोळीबार केला. यात सनी चौधरी जखमी झाला असून त्याच्यावर ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

गोळीबार केल्यानंतर आरोपी फरार झाले. मात्र पोलिसांनी सीसीटीव्हीच्या साहाय्याने कारची माहिती मिळवत एका आरोपीला अटक केली. तर अजून दोघांचा तपास अद्याप सुरु आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif