पालघर: विरारमध्ये महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धवा जायभाये यांच्यावर गोळीबार

विरार फाटा येथे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर शनिवारी रात्री ही घटना घडली. अज्ञात हल्लेखोरांनी सिद्धवा जायभाये यांच्यावर गोळीबार केला. मात्र, सुदैवाने या हल्ल्यात सिद्धवा यांना कोणतेही हानी झालेली नाही. या घटनेमुळे विरार फाटा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Firing | (Photo Credits: Pixabay)

पालघर (Palghar) जिल्ह्यातील विरार (Virar) उपनगरात गुन्हे अन्वेषण विभागातील महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक (Female Police Officer) सिद्धवा जायभाये (Siddhwa Jaybhaye) यांच्यावर गोळीबार (Firing) करण्यात आला आहे. विरार फाटा (Virar Phata) येथे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर शनिवारी रात्री ही घटना घडली. अज्ञात हल्लेखोरांनी सिद्धवा जायभाये यांच्यावर गोळीबार केला. मात्र, सुदैवाने या हल्ल्यात सिद्धवा यांना कोणतेही हानी झालेली नाही. या घटनेमुळे विरार फाटा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सिद्धवा जायभाये शनिवारी रात्री आपल्या घरी चालल्या होत्या. त्या विरार फाटा येते आल्या असता त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोराने गोळीबार झाडली. परंतु, ही गोळी जायभाये यांच्या कारच्या बोनेटला लागली. सुदैवान या हल्ल्यातून त्या बचावल्या आहेत. (हेही वाचा - केरळमध्ये कोरोना व्हायरची लागण झालेले 5 रुग्ण आढळले; 8 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)

सिद्धवा जायभाये घरी निघाल्या त्यावेळी त्यांच्यासोबत कारमध्ये 2 पोलीस सहकारीही होते. अज्ञात हल्लेखोराने एक राउंड फायर करून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताचं पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सिद्धवा जायभाये या 200 कोटी रुपयांच्या कार्पोरेट हॅकिंग प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी हॅकिंग प्रकरणी 7 जणांना अटक केली आहे. त्यामुळे जायभाये यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का? याचा तपास पोलिस करत आहेत.