Maharashtra Breaking News: पुणे गॅस गळती, सोलापूर फटाका कंपनी आग, जळगाव पेट्रोल पंप आग; या क्षणाच्या ठळक घडामोडी
हाती आलेल्या माहितीनुसार, पुणे येथील जंगली महाराज रोड (Jangli Maharaj Road) परिसरात गॅसगळती (Pune Gas Leak) झाली. तर सोलापूर येथील बार्शी परिसरात असलेल्या एका फटाका कंपनीलाही मोठी आग (Solapur Firecracker Company Fire) लागली. तिसरी घटना जळगाव येथे घडली.
Fires and Gas Leak News: पुणे, सोलापूर आणि जळगाव येथे घडलेल्या तीन महत्त्वाच्या घटनांनी राज्यातील प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधून घेतले. हाती आलेल्या माहितीनुसार, पुणे येथील जंगली महाराज रोड (Jangli Maharaj Road) परिसरात गॅसगळती (Pune Gas Leak) झाली. तर सोलापूर येथील बार्शी परिसरात असलेल्या एका फटाका कंपनीलाही मोठी आग (Solapur Firecracker Company Fire) लागली. तिसरी घटना जळगाव येथे घडली. या ठिकाणी एका पेट्रोल पंपावर वाहनात पेट्रोल भरत असताना अचानक आग (Jalgaon Petrol Pump Fire) भडकली. ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला या घटनांची कल्पना दिल्याने आगीवर आणि संभाव्य धोक्यावर नियंत्रण मिळवता आले.
सोलापूर येथील बार्शी परिसरात फटाका फॅक्टरीला आग
सोलापूर जिल्हायातील बार्शी तालुक्यात असलेल्या एका छोट्या गावात फटाका कंपनीला मोठी आग लागली. ही आग सकाळी 10.30 च्या दरम्यान भडकली. आगीचे कारण समजू शकले नाही मात्र आगीमध्ये जवळपास 40 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. उल्लेखनिय असे की, या कंपनीमध्ये 15 महिला कामगार काम करतात. मात्र, आज वटपौर्णिमेची सुट्टी असल्याने त्यांना सुट्टी होती. दरम्यान, ही घटना घडल्याने मोठा धोका टळल्याचे मानले जाते. (हेही वाचा, Attempt to Burn EVM Machine in Solapur: सोलापूर मतदारसंघात ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न (Watch Video))
व्हिडिओ
पुणे गॅस गळती
पुणे येथील जंगली महाराज रोडवर एका ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गॅस गळती झाली. रस्त्यावर काही काम सुरु होते. दरम्यान, येथून जाणाऱ्या गॅसवाहिनीस धक्का बसल्याने त्यातून गॅसगळती झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण होते. घटनास्थळापासून दूरपर्यंत गॅसगळतीचा आवाज आणि प्रभाव जानवत होता. दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने लागलीच उपाययोजना केल्याने संभाव्य धोका आणि हानी टळली. (हेही वाचा, Pune Fire: पोलिसांनी कारवाईत जप्त केलेल्या वाहनांना भीषण आग; पुण्यातील जंगली महाराज रोड येथील घटना)
जळगाव पेट्रोल पंप आग
जळगाव जिल्ह्यातील एका पेट्रोल पंपावर आज (21 जून) मोठी आग भडकली. प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या व्हिडिओनुसार या पेट्रोलपंपावर वाहनचालक नेहमीप्रमाणे इंधन भरण्यासाठी आले असता अचानक आग भडकली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्थानिक नागरिक, पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि प्रशासनाला चांगलेच प्रयत्न करावे लागले. मात्र, थोड्या वेळाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आगीचे कारण समजू शकले नाही.
दरम्यान, आगीच्या वेगवेगळ्या घटना घडल्या असल्या तरी, वरीलपैकी तिनही घटनांमध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. पाठिमागील काही दिवसांपासून कंपन्यांना लागणाऱ्या आगी, पट्रेल पंपावरही लागणाऱ्या आही चिंतेचा विषय ठरला आहे. अनेकदा नागरिकांकडून पेट्रोल पंपावर मोबाीलचा वापर, ज्वलनशील पदार्थ सोबत बाळगणे यांसारख्या कारणामुळे आग लागल्याचे सांगितले जात आहे.