Fire Incidents In Mumbai Due To Firecrackers: फटाक्यांमुळे मुंबईत अनेक ठिकाणी आगीच्या घटना; ठाण्यात कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग
तसेच शुक्रवारी रात्री मुंबई शहरात आगीच्या दोन घटना घडल्या. आगीच्या या घटनांमध्ये कोणतीही दुखापत झाली नाही. शुक्रवारी संध्याकाळी 6.30 ते 7 च्या दरम्यान मुंबईतील सायन येथील शिधावाटप कार्यालयात आग लागली.
Fire Incidents In Mumbai Due To Firecrackers: दिवाळीच्या (Diwali 2024) दिवशी मुंबई महानगर प्रदेशात आगीच्या चार घटना घडल्या. शनिवारी पहाटे फटाक्यांमुळे (Firecrackers) कळवा, ठाणे येथे कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग (Fire) लागली. तसेच शुक्रवारी रात्री मुंबई शहरात आगीच्या दोन घटना घडल्या. आगीच्या या घटनांमध्ये कोणतीही दुखापत झाली नाही. शुक्रवारी संध्याकाळी 6.30 ते 7 च्या दरम्यान मुंबईतील सायन येथील शिधावाटप कार्यालयात आग लागली. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फिनिक्स रोडवरील शिधावाटप कार्यालय, सन्मुखानंद हॉल, सायनजवळील माटुंगा न्यू पोलिस लाईनमध्ये आग लागली.
अंधेरी पूर्वतील निवासी भागात आग -
अंधेरी पूर्व, एमआयडीसी येथील निवासी भागात संध्याकाळी 7.50 च्या सुमारास दुसरी आग लागली. मुंबई अग्निशमन दलाने लेव्हल II वर आग लागल्याची घोषणा केली. काही वेळातचं तीन फायर इंजिन, तीन जंबो टँकर आणि एक रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. ही घटना महाखली लेणी रोड, भंगार वाडी, झोपडपट्टी, रोड क्रमांक 11, अंधेरी पूर्व MIDC मधील मारुती शाळेजवळ घडली, असं BMC ने आपल्या निवेदनात म्हटले आहे. रात्री 11.38 वाजता आग विझवण्यात आली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. (हेही वाचा -Mumbra-Shilphata Fire: मुंब्रा-शिळफाटा परिसरात सिलेंडरचा स्फोट; आगीत चार दुकाने जळून खाक)
ठाण्यात आगीच्या दोन घटना -
दरम्यान, ठाणे पश्चिमेतील कळवा येथे शनिवारी पहाटे 4.25 च्या सुमारास फटाक्यांमुळे कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागली. विटाव्यातील शांताराम नगर येथील शंकर मंदिराजवळ ही घटना घडली. ठाणे अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली असून शनिवारी सकाळी परिस्थिती नियंत्रणात आली. (हेही वाचा -Mumbai Fire: मुंबईत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आगीच्या तीन घटना; कोणतीही जीवितहानी नाही)
ठाण्यातील आणखी एका आगीच्या घटनेत, एचडीएफसी बँकेजवळील शीळ फाटा परिसरात फर्निचरच्या तीन दुकानांना आग लागली. ही आग लाकडी सोफा, कपाटे, बेड आणि इतर फर्निचर साहित्यापुरती मर्यादित होती. पहाटे 3.16 वाजता आग पूर्णपणे विझवण्यात आली. सुदैवाने आगीच्या चार घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.