Aarey Milk Colony मध्ये भीषण आगीचे तांडव
मुंबईच्या आरे कॉलनीमधील जंगलामध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
मुंबईच्या आरे कॉलनीमधील जंगलामध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. तर आगीचे दाट धुराचे लोट उसळत असल्याचे यावेळी पाहायला मिळाले.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. तर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान, ही आग लागली की मुद्दाम लावण्यात आली असल्याचे कारण अद्याप उघडकीस आले नाही. तर वनवा असल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात येत आहे.
पुढील सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...
(The above story first appeared on LatestLY on Dec 03, 2018 08:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

