Fashion Street Fire broke Out: मुंबईत फॅशन स्ट्रीट परिसरात आग, आगीवर नियंत्रण, मात्र कपड्यांची दुकाने जळाली, कोणतीही जीवित हानी नाही, व्हिडिओ व्हायरल

दुपारी 12 च्या सुमारास फॅशन स्ट्रीट येथील एका दुकानाला आग लागली. त्यानंतर ही लगतच्याही काही दुकांनाना लागली. आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र दरम्यान काही दुकानांचे मोठे नुकसान झाले. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

Fashion Street Fire (Photo Credits: ANI)

मुंबई शहरातील सातत्याने गर्दीने फुललेला आणि व्यापारी बाजारपेठ असलेल्या फॅशन स्ट्रीट (Fashion Street) परिसरात आग (Mumbai Fire) भडकल्याची घटना घडली आहे. दुपारी 12 च्या सुमारास फॅशन स्ट्रीट येथील एका दुकानाला आग लागली. त्यानंतर ही लगतच्याही काही दुकांनाना लागली. दरम्यान, अग्निशमन दलाला (Fire Brigade) या घटनेची माहिती मळाली. अग्निशमन दलाने तातडीने घटनासथळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठई प्रयत्न केला. फॅशन स्ट्रीट परिसरात मोठ्या प्रमाणावर कपड्यांची दुकाने असल्याने आग वाढत होती आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाला प्रयत्नांची पराकष्टा करावी लागत होती.

दरम्यान, अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे सहज शक्य झाले. या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. दरम्यान, वित्त हानी मात्र झाली. फॅशन स्ट्रीट परिसरातील 8 ते 10 दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ही दुकाने अक्षरश: जळून खाक झाली. आगीचे कारण समजू शकले नाही. अग्निशमन दलाच्या 6 गाड्या आणि जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्याचे फवारे वापरुन आग आटोक्यात आणली आणि त्यावर नियंत्रणही मिळवले. (हेही वाचा, Howrah Mail Express Caught Caught Fire: नाशिक रेल्वे स्टेशनमध्ये उभ्या असलेल्या हावडा मेलच्या बोगीला आग; व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल)

ट्विट

फॅशन स्ट्रीट हा बाजारपेठेचा परीसर असल्याने या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. प्रामुख्याने हा परिसर गर्दीचा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी कपड्यांची मोठी दुकाने एका रांगेत आहेत. शिवाय इतरही दुकाने आणि रस्त्यावरचे लोक मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच गर्दी पाहायला मिळते. अशा वेळी आगीसारखी दुर्घटना घडल्यास मोठी हानी होण्याची शक्यता असते. दरम्यान, अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे संभाव्य धोका टळला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif