Fire breaks out in Andheri West: पश्चिम अंधेरीत निवासी इमारतीला आग
मुंबई शहरातील पश्चिम अंधेरी परिसरातील लोखंडवाला परिसरात नेऊला या निवासी इमारतीला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या पाच घाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
Fire breaks out in Andheri West at Lokhandwala: मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरातील नेऊला नामक इमारतीला आग लागली आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग भडकली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचे कारण स्पष्टपणे पुढे आले नाही. मात्र, शॉर्ट सर्किटने आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
आग लागलेली इमारत ही निवासी इमारत आहे. त्यामुळे इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणाव कुटुंबे निवासास आहेत. आगीची माहिती कळताच इमारतीतील नागरिकांना बाहेर काढण्यात आले असून, संपूर्ण इमारत खाली करण्यात आली आहे. आगीचे नेमके कारण अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणून तपास केल्यावरच पुढे येऊ शकणार आहे.
दरम्यान, परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली असून, या नागरिकांना पांगवणे हे स्थानिक पोलिसांसाठी एक कामच होऊन बसले आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून आग लागलेल्या ईमारतीच्या बाजूच्या इमारत आणि रहिवाशांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 25, 2023 08:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

