Fire Breaks out At a Temple: राम नवमी उत्सवादरम्यान मंदिराला आग, व्हिडिओ व्हायरल; उत्सवादरम्यान अनेक ठिकाणी दुर्घटना (Watch Video)
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. राम नवमी हा एक हिंदू सण आहे.
आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) राज्यातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील दुवा गावात (Duva Village) रामनवमी (Rama Navami 2023) उत्सवादरम्यान एका मंदिराला आग (Fire Breaks out At a Temple) लागली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. राम नवमी हा एक हिंदू सण आहे. ज्या सणाला विष्णूचा सातवा अवतार रामाचा जन्मदिन साजरा (Rama Navami Celebrations) होतो. रामनवमी उत्सवादरम्यान घडलेली ही दिवसभरातील दुसरी घटना आहे. देशभरातील विविध ठिकाणी वेगवळ्या दुर्घटना घडल्या आहेत. यातील काही घटनांचे व्हिडओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मध्य प्रदेशातील इंदूर येधील बेलेश्वर महादेव झुलेलेलाल मंदिरातही रामनवमी दरम्यान एक दुर्घटना घडली. मंदिरातील इमारतीचे छत कोसळल्याने 25 पेक्षा अधिक लोक विहीरीत पडले. रामनवमीच्या वेळी मंदिरात मोठी गर्दी जमली असताना ही घटना घडली. या घटनेतही कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, काही लोख जखमी झाल्याचे समजते. (हेही वाचा, Shri Ram Janmotsav at Ayodhya Live Streaming: अयोद्धेचा राम जन्म सोहळा इथे पहा लाईव्ह (Watch Video))
ट्विट
दरम्यान, महाराष्ट्रातही राम नवमीच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुडा (Kiradpura) परिसरात दोन गटांमध्ये मध्यरात्री एकच्या सुमारास जोरदार राडा झाला. राम मंदिर परिसरात रामनवमीची (Ram Navmi 2023) तयारी सुरु असतानाच दोन्ही गटात हा राडा झाल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्मण झाले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत जमावाला काबूत आणले. परंतू दरम्यानच्या काळात जमाव हिंसक झाला. जमावाने पोलीस वाहनांसह इतर खासगी 13 चारचाकी वाहने जाळली. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार आणि अश्रुधुराचा मारा करावा लागला. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी हवेत 12 राऊंड फायर केले.