भारतीय सेनेच्या कर्नल आणि जवानांविरोधात सोयाबीन ची शेती नष्ट केल्याप्रकरणी FIR दाखल
यांनी सैन्याच्या 4 वाहनांनी सोयाबीन ची शेतीची नासधूस केली, असा आरोप तक्रारदाराने केला आहे
पुण्याच्या खेड पोलीस स्टेशनमध्ये सेनेचे कर्नल केदार विजय गायकवाड (Kedar Gaikwad) आणि 30-40 जवानांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. यांनी सैन्याच्या 4 वाहनांनी सोयाबीन ची शेतीची नासधूस केली, असा आरोप तक्रारदाराने केला आहे. ही घटना 22 जून रोजी घडली होती. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्नल गायकवाडांचे या शेतीला घेऊन संबंधित शेतमालकासोबत गेल्या कित्येक वर्षांपासून वाद सुरु आहे.
पोलिसांच्या सांगण्यानुसार, ज्या शेतीचे नुकसान झाले ती 65 एकराची जागा एका जमिनीचा हिस्सा आहे. या हिस्स्यावरून कर्नल चे कुटूंब आणि अन्य 2 कुटूंबांमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून वाद सुरु आहे. हा वाद 2013 पासून सेन्शन कोर्टात सुरु आहे.
त्या वादाचा राग मनात ठेवून कर्नल गायकवाडांनी 30 ते 40 जवानांना हत्यारासह या गावात आणले. नंतर एका ट्रॅक्टरद्वारे त्या वादग्रस्त जमिनीवर जोत फिरवला. ज्यात त्या तक्रादाराची सर्व सोयाबीन ची शेती उद्ध्वस्त केली.
हेही वाचा- 'इथे' अंडं फोडायला लागतो हातोडा, भारतीय सैनिकाने शेअर केला व्हिडीओ (Watch Video)
मात्र यात आपल्याला विनाकारण फसवले जात असल्याचे कर्नल गायकवाडांनी सांगितले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी FIR दाखल केली असून अधिक तपास सुरु आहे.