कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल
परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात रविवारी ठाकरे सरकारविरोधात पुण्यातील अलका चौकात आंदोलन करण्यात आले होते.
कोरोना (Coronavirus) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी शनिवार मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले होते. यात त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या खळबळजनक आरोपांमुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याचपार्श्वभूमीवर विरोधी पक्ष भाजपने राज्य सरकारविरोधात आक्रमक भुमिका घेतली आहे. याच मुद्द्यावरून चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात भाजप नेत्यांनी पुण्यात आंदोलन केली होती. मात्र, यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याने चंद्रकांत पाटील यांच्यासह 40-50 जणांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Wada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात रविवारी ठाकरे सरकारविरोधात पुण्यातील अलका चौकात आंदोलन करण्यात आले होते. मात्र, महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे अनेक शहरात कडक निर्बंध करण्यात आले आहे. तसेच गर्दी टाळण्याचे राज्य सरकारकडून आवाहन वारंवार आवाहन करण्यात येत आहे. मात्र, तरीही कोरोना नियमांचे उल्लंघन करत आंदोलन केली आहे. याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे देखील वाचा- Parambir Singh Letter Bomb: माजी मुंबई पोलिस आयुक्तांनी अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांत तथ्य नाही शरद पवार यांचा बचाव तर BJP कडून 'होम क्वारंटाईन' मध्ये पत्रकार परिषद कशी? चा सवाल
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नुकताच पत्रकारांशी संवाद साधला आहे. दरम्यान, राजेश टोपे म्हणाले की, राज्यात सध्या प्रतिदिन सुमारे तीन लाख नागरिकांना कोरोना लसीकरण केले जात आहे. कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम येत्या 3 महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती स्थिती पाहता प्रतिबंध म्हणून काही ठिकाणी लॉकडाऊन पुन्हा लागण्याची शक्यता आहे, असा इशाराही टोपे यांनी यावेळी दिला आहे.