Maharashtra Monsoon Updates: येत्या 24 तासांत महाराष्ट्राच्या विविध भागात विजांच्या कडकडासह जोरदार पावसाची शक्यता- Skymet
मात्र हवा तसा बरसला नाही. त्यामुळे सामान्यांपासून बळीराजाही चिंतेत आहे. मात्र महाराष्ट्रातील जनतेसाठी दिलासादायक बातमी आहे.
मान्सूनची प्रतिक्षा अखेर संपत महाराष्ट्रात पाऊस धडकला. मात्र हवा तसा बरसला नाही. त्यामुळे सामान्यांपासून बळीराजाही चिंतेत आहे. मात्र महाराष्ट्रातील जनतेसाठी दिलासादायक बातमी आहे. स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या 24 तासांत महाराष्ट्रातील अलिबाग, कोल्हापूर, मुंबई, मुंबई उपनगरं, नागपूर, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि ठाणे या भागात थंडीच्या लाटेसह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Maharashtra Monsoon 2019 Live Updates: मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात)
ANI ट्विट:
स्कायमेटचा हा अंदाज अचूक ठरावा, अशीच महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे. आतापर्यंत हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज खरा ठरताना दिसत नव्हता. यापूर्वी मान्सून महाराष्ट्रात येण्यास उशिर झाला असून दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला पावसाची नितांत आवश्यकता आहे.