Mumbai International Airport वर सकाळी प्रवाशांच्या अनपेक्षित गर्दीने काही काळ गोंधळाची परिस्थिती, काहींच्या सुटल्या फ्लाईट्स; पहा फोटो, Videos
Vistara आणि Indigo कडून प्रवाशांना गोंधळ, गैरसोय टाळण्यासाठी वेळेत विमानतळावर पोहचण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
आज (8 ऑक्टोबर) मुंबई मध्ये सकाळी 6 नंतरची बहुतांश सारीच डोमॅस्टिक फ्लाईट्स (Domestic Flights) उशिराने झेपावली आहेत. मुंबई एअरपोर्ट टर्मिनल 2 (Mumbai International Airport) वर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याने सिक्युरिटी चेक आणि पुढील सार्याच गोष्टींना उशिर झाल्याने मोठं गोंधळाचं वातावरण पहायला मिळालं. यावेळी काहींना त्यांचं फ्लाईट देखील पकडता आलेले नाही. दरम्यान विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार देशामध्ये सणासुदीचा काळ असल्याने अनेक जण प्रवासासाठी बाहेर पडले आहेत. पण गर्दीचा अंदाज न आल्याने हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान प्रवाशांची गर्दी पाहता आता विमानतळावर अधिक कर्मचारी वाढवण्याचं काम सुरू आहे. कोविड काळातही प्रवाशांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता असणार आहे असे सांगत मुंबई विमानतळ प्रशासनाने आजच्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. मुंबई मध्ये टर्मिनल 2 प्रमाणे 20 ऑक्टोबर पासून टर्मिनल 1 देखील सुरू होणार असल्याचं सांगण्यात आले आहे. नक्की वाचा: मुंबई मध्ये Terminal 1 Vile Parle वरून फ्लाईट्स 20 ऑक्टोबर पासून होणार सुरू.
मुंबई विमानतळ प्रशासन ट्वीट
5पैसा कॅपिटल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश गगदानी, गायक विशाल डडलानी हे देखील आज प्रवास करत होते. त्यांनी मुंबई विमानतळावरीच गर्दीची स्थिती ट्वीट करून सांगितली आहे. विमानतळावरील कर्मचारी प्रयत्न करत आहेत, परंतु ही गर्दी सांभाळण्यात ते अयशस्वी ठरले आहेत. हा भोंगळ कारभार कोण चालवतंय? त्यांना टॅग करा,” असं विशालने ट्वीट केले आहे. नक्की वाचा: पुणे एअरपोर्ट रनवेच्या पुनरुत्थानाच्या कामांमुळे 16-29 ऑक्टोबर दरम्यान बंद राहणार.
विशाल ददलानी ट्वीट
मुंबई टी 2 वरील गोंधळ
आज सकाळी 6 पूर्वीची डोमॅस्टिक फ्लाईट्स वेळेत उडू शकली आहेत. यामध्ये एअर इंडियाच्या मुंबई ते गोवा, हैदराबाद, नागपूर स्पाईसजेट च्या कोचिन आणि इंडिगो च्या उदयपूर, कोलकाता फ्लाईट्सचा समावेश आहे. सकाळी 6 नंतरच्या बहुतांश फ्लाईट्स उशिराने उडाल्या आहेत. Vistara आणि Indigo कडून प्रवाशांना गोंधळ, गैरसोय टाळण्यासाठी वेळेत विमानतळावर पोहचण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.