मुलुंड येथील कारखान्यात एफडीएकडून लाखो रुपयांचा रसायनयुक्त आमरस जप्त

आंब्याच्या एक सीजन मध्ये मुलुंड येथील एका आमरस उत्पादक कारखान्यातुन भेसळ युक्त आरास जप्त करण्यात आला आहे.

Image for Representation (Photo Credits: Instagaram)

मे महिन्याच्या उन्हाळयात आनंदाचं मोठं कारण म्हणजे आमरस, प्रत्येक आंबा प्रेमी हा आमरसाची चव चाखण्यासाठी मे महिन्याची आतुरतेने वाट बघत असतो. पण ऐन सिजनच्या मध्येच मुलुंड (Mulund) येथील एका अन्नपदार्थ उत्पादन करणाऱ्या कारखान्यात रसायनमिश्रित आमरस (Chemicals Mixed) बनवला जात असल्याच्या बातमीने आंबा रसिकांची निराशा झाली आहे. एबीपी माझाच्या विशेष वृत्तानुसार, एफडीए (FDA) म्हणजेच अन्न व औषध प्रशासनातर्फे मुलुंड येथील राज इंडस्ट्रियल इस्टेट येथील विजय स्टोअर्स या आमरस उतपादन करणाऱ्या कारखान्यावर छापा मारत तब्बल 8  लाख 83 हजार रुपये किंमतीचा 3 हजार 425  किलो आमरस जप्त केला आहे.

एफडीएने जप्त केलेल्याआमरसाचे काही नमुने परीक्षणासाठी पाठवण्यात आले आहेत, तसेच या आमरसात जर रसायनांचे प्रमाण अधिक आढळले तर उत्पादकांना 5 लाखांपर्यंतचा दंड आणि तुरुंगाची शिक्षा भोगायला लागू शकते. आंबा खरेदी करताय? फसवणूक टाळण्यासाठी, असा ओळखा कोकणी हापूस

सोबतच एफडीएने ग्राहकांसाठी देखील आमरस विकत घेताना खुला घेण्यापेक्षा एखाद्या चांगल्या कंपनीचे पॅकिंग असलेले उत्पादन विकत घ्या, कमीत कमी आंब्यांपासून जास्त आमरस बनवण्याच्या प्रयत्नात रसायनांचा अधिक वापर केलं जातो हे रसायन मिश्रीत आमरस आरोग्यास अपायकारक ठरू शकतात असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्य्क आयुक्त शैलेश आढाव यांनी सांगितले.