Nagpur Shocker: वडिलांनी मोबाईलचा जास्त वापर करण्यास दिला नकार; 16 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या
जिथे एका किशोरवयीन मुलीने मोबाईच्या वापरावरून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शहरातील हिंगणा पोलीस ठाण्याच्या (Hingana Police Station) हद्दीतील मांगली गावात ही घटना घडली.
Nagpur Shocker: आजकाल मुलांना मोबाईलचे (Mobile Phone) इतके व्यसन लागले आहे की, ते खाण्यापासून ते झोपेपर्यंत त्याचा वापर करणे सोडत नाहीत. त्यांचे जग फक्त मोबाईलपुरतेच मर्यादित होत चालले आहे. मोबाईच्या अतिरिक्त वापरामुळे लहान मुलांना शारिरिक मेहनतीचे खेळ खेळणदेखील नकोस झालं आहे. अनेक वेळा त्यांचे कुटुंबीय या गोष्टीमुळे खूप चिंतित होतात आणि त्यांच्यावर बंधने घालू लागतात. मुलांना कुटुंबातील सदस्यांकडून हे निर्बंध अप्रिय वाटतात.
मोबाईलच्या अतिवापराचे असेच एक प्रकरण नागपुरातून (Nagpur) समोर आले आहे. जिथे एका किशोरवयीन मुलीने मोबाईच्या वापरावरून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शहरातील हिंगणा पोलीस ठाण्याच्या (Hingana Police Station) हद्दीतील मांगली गावात ही घटना घडली. (हेही वाचा -Delivery Boy Committed Suicide: प्रेयसीने आई-वडिलांना सोडून जाण्यास भाग पाडल्याने 22 वर्षीय डिलिव्हरी बॉयची आत्महत्या)
या घटनेची माहिती देताना पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 16 वर्षीय मुलीच्या वडिलांनी तिला मोबाईल फोनचा जास्त वापर करू नको असं सांगितलं. तरुणी जास्तीत-जास्त वेळ मोबाईल वापरण्यावर घालवत होती. आपल्या मुलीच्या मोबाईल फोनवर जास्त अवलंबित्वामुळे चिंतित असलेल्या वडिलांनी तिला मोबाईळ कमी वापरण्यास सांगितले. याचा राग येऊन मुलीने राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. (हेही वाचा - Uttar Pradesh Shocker: शाळेत जाण्यास नकार दिल्याने आईने मुलीला फटकारले; 13 वर्षीय मुलीची चालत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या)
दरम्यान, या धक्कादायक घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून मुलीच्या टोकाच्या भूमिकेमुळे पालकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तथापी, या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तसेच पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.