Jalna Shocker: घर विकण्यास विरोध केल्याने बापाची हत्या, आरोपी मुलाला अटक, जालना हादरलं

जालना जिल्ह्यात कौटुंबिक वादातून मुलाने वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Death | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

Jalna Shocker: जालना (Jalna) जिल्ह्यात कौटुंबिक वादातून मुलाने वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने गावात मोठी खळबळ उडाली आहे. राहते घर विकण्यास वडिलांनी विरोध केला याच कारणावरून हत्या (Murder) करण्यात आल्याचे समोर आले आहे. इब्राहीम खान मुबारक खान  (60) असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शाहरुख इब्राहीम खान (30) असं आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी मुलावर गुन्हा दाखल केला आहे.

सुत्रांकडून मिळालेल्याम माहितीनुसार,  जालना जिल्ह्यातील गांधीनगर परिसरात सोमवारी हत्या करण्यात आली. मुलाने किरकोळ वादावरून वृध्द वडिलांच्या डोक्यात लाकडू दाड्यांने मारहाण केली. दुपारी घडलेल्या या घटनेने संपुर्ण गाव हादरलं आहे. गावात ही घटना पसरताच, पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले. काही दिवसांपासून मुलगा वडिलांना राहते घर विकण्यास सांगत होता. मात्र, वडिलांनी याचा परस्पर विरोध केला. त्यामुळे त्यांच्या नेहमी वाद व्हायचे अशी माहिती शेजारच्यांनी पोलिसांना दिले. लाकडी दांड्याने वार करून त्यांना जखमी केले. हल्ल्यात ते गंभीर जखमी होऊन ते रक्तबंबाळ होऊन ते बेशुध्द पडले. दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

घर विकण्यास विरोध केल्याने रागाच्या भरात मुलाने टोकाचे पाऊल उचलले. आणि वडिलांची निर्घृण हत्या केली. पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले असून त्याचावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement