Indapur Accident: इंदापूरमध्ये ट्रकचा भीषण अपघात, एका महिलेचा मृत्यू

ऐवढ्यात वारकऱ्यांचा ट्रकचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. इंदापूर येथे वारकऱ्यांना घेऊन जाणारा टेम्पो पलटला आहे.

Accident | (Photo credit: archived, edited, representative image)

Indapur Accident: पंढरपूरची वारी संपली असता, वारकरी घराकडे निघाले आहे. ऐवढ्यात वारकऱ्यांचा ट्रकचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. इंदापूर येथे  वारकऱ्यांना घेऊन जाणारा टेम्पो पलटला आहे. या अपघातात एका वारकऱ्याचा मृत्यू झाला आहे. अनेक वारकरी अपघातात जखमी झाले आहे. अपघातामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा-जळगाव मध्ये भरधाव कारने 5 महिलांना उडवलं; वृद्ध महिलेचा मृत्यू)

मिळालेल्या माहितीनुसार, वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेऊन घरी जात होते. इंदापूर येथील रामवाडी गावात वारकऱ्यांना घेवून जाणारा या ट्रकचा भीषण अपघात झाला. वारकऱ्यांचा ट्रक रस्त्यामध्ये उलटला. या ट्रकमध्ये ११ जण प्रवास करत होते. ट्रक उलटल्याने रस्त्यावर बराच वेळ गोंधळ निर्माण झाला. अपघातात १० जण जखमी झाले.

अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली. अपघाताची माहिती मिळताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी जखमींना इंदापूर येथील रुग्णालयात दाखल केले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिसांनी अपघातात मृत झालेल्या महिलेचा मृतदेह ताब्यात घेतले आहे. या अपघाताचे नेमके कारण पोलिस शोधत आहे. अपघातात ट्रकचे भरपूर नुकसान झाले आहे.