Beed: खळबळजनक! भावकीच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, बीड येथील धक्कादायक घटना

भावकीच्या वादातून एका तरूणावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना बीड (Beed) जिल्ह्यातील येळंब घाट (Yelamb Ghat) परिसरात घडली आहे. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे.

Beed: खळबळजनक! भावकीच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, बीड येथील धक्कादायक घटना
Representational Image (Photo: Twitter)

भावकीच्या वादातून एका तरूणावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना बीड (Beed) जिल्ह्यातील येळंब घाट (Yelamb Ghat) परिसरात घडली आहे. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात  तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. संबंधित तरूणाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. बीड येथील एका रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बबलू पवार असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्याच्यावर येळंब घाट परिसरात धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या हल्ल्यानंतर तब्बल दीडतास तो रस्त्याच्या कडेला तडफडत होता. परंतु, भांडणाच्या दहशतीमुळे कोणीही त्याच्या मदतीला धावून आले नाही. त्यानंतर पत्रकरांनी रुग्णवाहिकेला फोन केला आणि त्याला उपचारासाठी नेकनूरला पाठवला. त्यानंतर प्राथमिक उपचार करून पुढे बीडला रुग्णाला हलवण्यात आले आहे. बबलू पवार याची प्रकृती गंभीर असून बीड येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हे देखील वाचा- अलिबाग: पोलीस, पत्रकार, शासकीय कर्मचाऱ्यांनी जपली माणुसकी! कुटूंबियांनी मृतदेह नाकारल्याने कोरोनाबाधितावर केले अंत्यसंस्कार

भावकीच्या वादातून बबलू पवार याच्यावर हल्ला आणि त्यानंतर ट्रॅक्टर जाळल्याचा प्रकार घडल्याची चर्चा आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पण दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेनं परिसरात दहशतीचे वातावरण आहे. या संदर्भात न्यूज 18 लोकमतने वृत्त दिले आहे.

याआधी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील साळेगाव परिसरात 40 वर्षीय सासूच्या तिच्या जावायानेच हत्या केल्याची घटना घडली होती. त्यावेळी जावायाने सासूच्या डोळ्यात मिरची पूड टाकून धारदार कोयत्याने सपासप वार केले. दरम्यान, या महिलेसोबत असलेला एक व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. या हल्ल्यानंतर जखमी महिलेला अंबेजोगाई येथील एका शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

(The above story first appeared on LatestLY on May 02, 2021 06:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).