Farmer Suicide Attempt in Beed: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ध्वजारोहणावेळी शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील धक्कादायक प्रकार
सुदैवाने पोलीस आणि सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान दाखवत शेतकऱ्याला आत्महत्या करण्यापासून वाचवलं.
Farmer Suicide Attempt in Beed: आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन (Marathwada Liberation Day) मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये उत्साहात साजरा केला जात आहे. या दिवसाचे औचित्य साधून आज मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. मात्र, ध्वजारोहण करताना बीड (Beed) जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ध्वजारोहण सुरू असतानाच एका शेतकऱ्याने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या (Farmer Suicide) करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पोलीस आणि सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान दाखवत शेतकऱ्याला आत्महत्या करण्यापासून वाचवलं.
प्राप्त माहितीनुसार, आज सकाळी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ध्वजारोहण सुरू होत. यावेळी एका शेतकऱ्याने प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी आत्महत्येचा प्रयत्न केला. शिवाजी उपाडे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. हा शेतकरी बीड जिल्ह्यातील शिरसाळा गावातील आहे. (हेही वाचा - Lift Accident In Mumbai : लिफ्टमध्ये अडकलेल्या 26 वर्षीय शिक्षिकेचा मृत्यू; मुंबईच्या मालाड येथील नामांकीत शाळेतील घटना)
दरम्यान, शिवाजी उपाडे यांचा अनेक वर्षांपासून जमिनीचा वाद प्रलंबित आहे. प्रलंबित जमिनीच्या वादासाठी त्यांनी अनेकदा प्रशासनाकडे कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, अधिकारी कोणतीही कारवाई करत नाहीत, म्हणून उपाडे यांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ध्वजारोहणावेळी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी उपाडे यांना ताब्यात घेतलं असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे.
तथापी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त औरंगाबादमधील सिद्धार्थ उद्यानात ध्वजारोहण केलं. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यासाठी काही घोषणाही केल्या. औरंगाबादमधील वेरूळ मंदिरासाठी 136 कोटींचा निधी, पैठणमध्ये संत उद्यान, पाणीपुरवठा योजना, शिर्डी महामार्ग, क्रीडा संकुल बनवणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच जायकवाडी कालवा दुरुस्ती करणार, मराठवाड्यात पाणी वळवण्यासाठी प्रकल्प, जालना पाणीपुरवठा नूतनीकरण, नांदेड जिल्हा क्रीडा संकुलासाठी निधी, लातूरमध्ये कृषी महाविद्यालय तरतूद करण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.